India vs England 3rd Test: जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. हे त्याने अनेकदा सिद्ध केलं आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते. तो संघाला विकेट्स काढून देतो. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. लॉर्ड्स कसोटीत त्याने इंग्लंडच्या ५ फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं .

जसप्रीत बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जसप्रीत बुमराह हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने या स्पर्धेत आतापर्यंत १२ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. या यादीत भारताचा माजी गोलंदाज आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. अश्विनने ११ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने १० वेळेस आणि नॅथन लायनने देखील १० वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. बुमराह या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज

जसप्रीत बुमराह –१२ वेळेस
आर अश्विन –११ वेळेस
पॅट कमिन्स –१० वेळेस
नॅथन लायन –१० वेळेस

कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला

इंग्लंडमध्ये ५ गडी बाद करताच जसप्रीत बुमराहच्या नावे आणखी एक मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. परदेशात खेळताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराहने कपिल देव यांना मागे टाकलं आहे. जसप्रीत बुमराहने परदेशात गोलंदाजी करताना १३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. कपिल देव यांनी १२ वेळेस ५ गडी बाद केले होते. या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अनिल कुंबळे यांजी १० वेळेस हा कारनामा केला होता.

परदेशात सर्वाधिक वेळेस ५ गाडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

जसप्रीत बुमराह –१३ वेळेस
कपिल देव –१२ वेळेस
अनिल कुंबळे –१० वेळेस
ईशांत शर्मा –९ वेळेस
आर अश्विन –८ वेळेस
बी चंद्रशेखर – ८ वेळेस
जहीर खान –८ वेळेस