Neeraj Chopra Net Worth: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि काही पाश्चिमात्य देशांचा दबदबा राहिला असला तरी भालाफेक या खेळात मात्र या देशांना यश आले नाही. या खेळात पाकिस्तानच्या अरशद नदीमने सुवर्ण, भारताच्या नीरज चोप्राने रौप्य तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने कास्य पदक जिंकले. या खेळावर पूर्वी पास्चिमात्य देशातील खेळाडूंचे वर्चस्व होते. मात्र आता आशियातील दोन खेळाडू स्वतःचे वर्चस्व गाजवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या नीरजने भालाफेकच्या अंतिम फेरीत ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले होते. त्याचवेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर थ्रो करून सुवर्णपदकावर कब्जा केला. १९९२ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे. त्याचबरोबर भारताचा नीरज हा भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकण्याचा मान मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.

हे वाचा >> बाईक आणि कारचं भन्नाट कलेक्शन, घरावर तिरंगा अन् गणपतीचं मंदिर… नीरजच्या अलिशान घराचा VIDEO व्हायरल

नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असले तरी पंतप्रधान मोदींपासून ते भारतातील सर्वच क्रीडा चाहत्यांनी त्याच्या या कामगिरीचे मनापासून कौतुक केले. टोक्यो ऑलिम्पिक २०२० आणि २०२३ च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला एक वलय प्राप्त झाले. साहजिकच जाहिरातीच्या जगतात त्याला महत्त्व प्राप्त झाले.

नीरजची संपत्ती किती?

जीक्यू इंडियाच्या वृत्तानुसार, नीरजकडे सध्या अंदाजे ३७ कोटींची संपत्ती आहे. सध्या त्याच्याकडे ओमेगा, अंडर आर्मर असे मोठे ब्रँड्स आहेत.

पाकिस्तानच्या अरशद नदीमची संपत्ती किती?

नीरज चोप्राच्या तुलनेत अरशद नदीमची संपत्ती कमी असल्याचे सांगितले जाते. माध्यमातील काही वृत्तानुसार ती एक कोटींच्याही कमी आहे. साहजिकच यंदा सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या त्याच्या संपत्तीबाबत ठोस माहिती नसली तरी पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झाला. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पाकिस्तानकडून त्याला १५३ दशलक्ष पाकिस्तानी रुपये देण्यात आले.

हे वाचा >> विश्लेषण : नीरज चोप्रासाठी येथून पुढे सुवर्णपदकाची वाट खडतर? अर्शद नदीमशी स्पर्धा करताना ९० मीटरचा पल्ला ठरणार निर्णायक!

तसेच तो ज्या पंजाब राज्यातून येतो तेथील मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी त्याला १०० दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला, असे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने दिले आहे. पंजाबचे राज्यपाल सरदार सलीम हैदर खान यांनीही त्याला दोन दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला.

सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्‍यांनी ५० दशलक्ष हजार सिंधच्या राज्यपालांनीही १ दशलक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javelin throwers neeraj chopra and arshad nadeem net worth know more kvg
Show comments