सैन्यदलासोबत सराव करण्याची कल्पना प्रेरणादायी असून त्यांच्याकडून संघटित राहण्याचा धडा शिकता आला, असे मत भारतीय फुटबॉलपटू जेजे लाल्पेखलुआ आणि जॅकीचंद सिंग यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘‘ही संकल्पना आमच्यासाठी नवीन होती. जवानांकडून होणाऱ्या त्यागामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली,’’ असे मत जॅकीचंद याने व्यक्त केले, तर जेजे म्हणाला, ‘‘हा अनुभव अविश्वसनीय होता.’’
२०१८ च्या विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून संघाने रविवारी बंगळुरू येथे सैन्यदलासोबत सराव केला. पात्रता फेरीत भारतीय संघ ११ जून रोजी ओमान संघाशी सामना करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2015 रोजी प्रकाशित
जवानांसोबत सराव करून प्रेरणा
सैन्यदलासोबत सराव करण्याची कल्पना प्रेरणादायी असून त्यांच्याकडून संघटित राहण्याचा धडा शिकता आला, असे मत भारतीय फुटबॉलपटू जेजे लाल्पेखलुआ आणि जॅकीचंद सिंग यांनी सोमवारी व्यक्त केले.

First published on: 09-06-2015 at 12:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeje jackichand football