जेमिमा रॉड्रीग्ज एकटी ७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला भारी पडली. जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाच्या विजयाची हिरो ठरली. जेमिमा अफलातून खेळी करत आठ वर्ष अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा विजय रथ थांबवला. भारताच्या विजयानंतर जेमिमा कुटुंबियांना भेटताना भावुक झाली. तिच्या बाबांना मिठी मारत
जेमिमच्या वादळी खेळीमुळे भारताला आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. या सामन्यातील शतकी खेळीनंतर रॉड्रिग्ज महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामन्यात शतक करणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली.
भारताची विजयानंतर ही मुंबईकर क्रिकेटपटू तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेली. आई-वडिलांना मिठी मारतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि या क्षणाने चाहतेही भावुक झाले. भारताचा सेमीफायनल सामना पाहण्यासाठी जेमिमाचं संपूर्ण कुटुंब मैदानात हजर होतं. भारताला विजय मिळवून दिल्याचं कळताच जेमिमाला आनंदाश्रू अनावर झाले आणि ती मैदानावरही रडताना दिसली. तर सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतरही तिने रडतानाच मुलाखत दिली.
जेमिमासाठी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धा फार चढउतारांची राहिली. जेमिमाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये ती फेल ठरली. यानंतर जेमिमाला प्लेईंग इलेव्हनमधून ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात तिला पुन्हा संधी मिळाली आणि तिने ७६ धावांची नाबाद खेळी करत आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवला. तोच फॉर्म कायम ठेवत जेमिमा सेमीफायनल सामन्यात उतरली आणि तिने उत्कृष्ट खेळी केली.
जेमिमा दुसऱ्या षटकात फलंदाजीला उतरली आणि शेवटपर्यंत मैदानावर उभी राहत संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. जेमिमाला तिच्या फॉर्मबरोबर या सामन्यात नशीबानेही साथ दिली. जेमिमाला सामन्यात तीन वेळा जीवदान मिळालं आणि तिने याचा पुरेपूर फायदा करून घेत १२७ धावांची नाबाद उत्कृष्ट खेळी केली. यासह भारतीय संघाने ९ चेंडू शिल्लक ठेवत ३३९ धावांचे लक्ष्य गाठले आणि विश्वविक्रमी विजय मिळवला.
