महाराष्ट्र व मुंबई या दोन्ही संघांना कनिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील पहिल्याच लढतीत पराभवाचा धक्का बसला. त्यांना अनुक्रमे भोपाळ व कर्नाटक यांनी पराभूत केले.
चुरशीने झालेल्या लढतीत भोपाळने महाराष्ट्राला २-१ असे पराभूत केले. रझिक शेख याने २८ व्या मिनिटाला महाराष्ट्राचे खाते उघडले. त्याने पेनल्टी कॉर्नरद्वारा हा गोल केला. मात्र भोपाळ संघाच्या अमीर उर रेहमान याने ३७ व्या मिनिटाला गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. ६५ व्या मिनिटाला त्याचा सहकारी शहनवाझ खान याने गोल करीत भोपाळला २-१ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत त्यांनी हा सामना जिंकला. कर्नाटकला मुंबईविरुद्ध ३-२ असा विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. कर्नाटकच्या एम.डी.राहील याने १९ व्या व ३८ व्या मिनिटाला गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पृथ्वीराज याने ४७ व्या मिनिटाला कर्नाटकचा आणखी एक गोल केला. मुंबईकडून विनय वाल्मिकी याने ३८ व्या मिनिटाला व राजेंद्र पवार याने ५३ व्या मिनिटाला गोल केला. अन्य लढतीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने छत्तीसगढ संघाचा ७-१ असा धुव्वा उडविला. हॉकी ओडिशा संघाने हिमाचल प्रदेशवर २-१ अशी मात केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2014 रोजी प्रकाशित
कनिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : महाराष्ट्र, मुंबईला पराभवाचा धक्का
महाराष्ट्र व मुंबई या दोन्ही संघांना कनिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील पहिल्याच लढतीत पराभवाचा धक्का बसला. त्यांना अनुक्रमे भोपाळ व कर्नाटक यांनी पराभूत केले.
First published on: 02-04-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junior national hockey championship maharashtra mumbai lost their matches