ठाण्यातील मावळी मंडळ येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत पुरुष विभागात कुणबी सेवा संघ, भारत स्पोर्ट्स क्लब, तर महिला विभागात सावित्रीबाई फुले स्पोर्ट्स क्लब व शिवशक्ती संघाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष विभागाच्या चुरशीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या कुणबी सेवा संघाने ठाण्याच्या नवरत्न क्रीडा मंडळाचा २३-२१ असा पराभव केला. सुशांत माडवकर याची उत्कृष्ट चढाई आणि सचिन सावंत याने दिलेली पकडीची साथ याच्या जोरावर कुणबी सेवा संघाने हा विजय मिळवला.
भारत स्पोर्ट्स क्लबने १०-१८ अशा पिछाडीवरून सर्वोत्तम खेळ करत यंग विजय क्रीडा मंडळाचा २४-२१ असा पराभव केला. जन्मैजय राणे, प्रथमेश कलझूनकर यांनी या विजयात मोलाची भूमिका बजावली.
महिला विभागात उपनगरच्या सावित्रीबाई फुले क्लबने शिवतेज क्रीडा मंडळाचा ३७-२१ असा दारुण पराभव केला. अंजली रोकडेने चढाईत, तर पूजा सुर्वेने पकडीत संघाचा विजयी मार्ग सुकर केला. शहरच्या शिवशक्ती संघाने नवी मुंबईच्या ग्रिफीन जिमखाना संघाचा ५५-२० असा धुव्वा उडविला. रेखा सावंतच्या उत्कृष्ट चढाया आणि काजल पेडामकरच्या पकडी यांना या विजयाचे श्रेय जाते.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2015 रोजी प्रकाशित
कुणबी सेवा संघ तिसऱ्या फेरीत
ठाण्यातील मावळी मंडळ येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत पुरुष विभागात कुणबी सेवा संघ, भारत स्पोर्ट्स क्लब, तर महिला विभागात सावित्रीबाई फुले स्पोर्ट्स क्लब व शिवशक्ती संघाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
First published on: 19-04-2015 at 06:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi