Kapil Parmar praised by PM Modi after win Bronze medal in Judo at Paris Paralympics 2024 : भारताचा पॅरा ज्युडोपटू कपिल परमारने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. कपिलने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या J1 स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत ब्राझीलच्या एलिटॉन डी ऑलिव्हेराचा पराभव केला. त्याने एलिटॉन १०-० असा पराभव करत कांस्य मिळवण्यात यश मिळवले. यासह कपिलने इतिहासही घडवला आहे. कारण पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो भारतातील पहिला ज्युडोपटू ठरला आहे. त्यामुळे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या २५ पोहोचली आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी कपिल परमारच्या कामगिरीचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन –

पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कपिल परमारच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले. पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले, “एक अतिशय संस्मरणीय खेळातील कामगिरी आणि एक विशेष पदक. कपिल परमार पॅरालिम्पिक स्पर्धेतील ज्युडोमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. पॅरालिम्पिक २०२४ मधील पुरुषांच्या ६० किलो (जे1) वजनी गटात देशासाठी दमदार कामगिरी करत ज्युडोमध्ये कास्य पदक जिंकल्याबद्दल कपिल परमारचे अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”

उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने सुवर्णपदक हुकले –

२०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत परमारने याच प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. त्याने उपांत्यपूर्व फेरीत व्हेनेझुएलाच्या मार्को डेनिस ब्लँकोचा १०-० ने पराभव केला, परंतु उपांत्य फेरीत इराणच्या एस बनिताबा खोर्रम अबादीकडून पराभव पत्करावा लागला. परमारला दोन्ही सामन्यात प्रत्येकी एक पिवळे कार्ड मिळाले. कपिलला सुवर्णपदक मिळवून देता आले नसले तरी कांस्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला. जे खेळाडू अंध आहेत किंवा कमी दृष्टी आहेत ते पॅरा ज्युडोमध्ये J1 श्रेणीत सहभागी होतात.

हेही वाचा – Video : “मी आणि विराट परफेक्ट पालक नाही…” अनुष्का शर्माचे पालकत्वावर मोठे वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाली?

भारतीय पॅरालिम्पिक समितीचे लक्ष्य पूर्ण –

भारतीय पॅरालिम्पिक समितीने या स्पर्धेपूर्वी किमान २५ पदके जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली होती आणि हे लक्ष्य साध्य झाले आहे. यामुळे येथील पॅरा खेळाडूंची कामगिरी अपेक्षेपेक्षा जास्त असेल. मात्र, सुवर्णपदक जिंकण्याचा दुहेरी आकडा गाठण्याची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. पॅरिस गेम्समध्ये भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि ११ कांस्यपदके जिंकली आहेत.

हेही वाचा – मेसी, रोनाल्डो यांना वगळले! बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर

कोण आहे कपिल परमार –

कपिल परमार हा मध्य प्रदेशातील शिवोर नावाच्या छोट्या गावातील रहिवासी आहे. परमारचा लहानपणी अपघात झाला होता. गावातील शेतात खेळत असताना चुकून त्याचा पाण्याच्या विद्युत पंपाला स्पर्श झाला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यानंतर बेशुद्ध झालेल्या परमारला रुग्णालयात नेण्यात आले आणि सहा महिने तो कोमात राहिला. चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये तो सर्वात लहान आहे. परमारचे वडील टॅक्सी चालक आहेत तर त्याची बहीण प्राथमिक शाळेत काम करते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil parmar praised by pm modi after win bronze medal in judo j1 at paris paralympics 2024 vbm