आयपीएलच्या सातव्या मोसमासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे कर्णधारपद केवीन पीटरसनकडे सोपविण्यात आले आहे. तसेच पंजाब संघाचे नेतृत्वही ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली सांभाळणार आहे. याआधी राजस्थान रॉयल्स संघाने शेन वॉटसनला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. अशाप्रकारे आयपीएलच्या या मोसमात परदेशी खेळाडूंच्या नेतृत्वाची रंगत पहायला मिळणार आहे.
२०१२ मध्ये केविन पीटरसन दिल्ली डेअरडेविल्समध्ये दाखल झाला होता. केवीनने आपल्या तडफदार खेळीच्या बळावर महत्वाच्यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु, गेल्या वर्षी दुखापतीमुळे केवीनला आयपीएलमध्ये खेळता आले नव्हते. यंदा दिल्लीने ‘मॅचिंग कार्ड’ पर्याय वापरून पीटरसनला नऊ कोटींच्या बोलीवर आपल्याकडेच ठेवले आणि संघाची धुरा त्याच्याकडे सोपिवली. तसेच यावेळीच्या लिलावात १२ कोटींचा धुमधडाका करणारा दिनेश कार्तिक दिल्ली डेअरडेव्हिल्सचा उपकर्णधार म्हणून भूमिका निभावणार आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kevin pietersen to lead delhi daredevils in indian premier league