आयपीएल २०२१च्या ४१व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आज आमनेसामने आले आहेत. पृथ्वी नसल्यामुळे शिखर धवनसोबत स्टीव्ह स्मिथने सलामी दिली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या धवनला लॉकी फर्ग्युसनने पाचव्या षटकात झेलबाद केले. धवनने स्मिथसोबत ३५ धावांची सलामी दिली. धवनने आपल्या २४ धावांच्या खेळीत ५ चौकार ठोकले. दरम्यान शिखर धवनने पुन्हा ऑरेंज कॅप काबीज केली आहे.

सनरायझर्स हैदराबादने सोमवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा पराभव करून पाच सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित केली. हैदराबादने राजस्थानचा सात गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने ८२ धावा केल्या होत्या. यासह त्याने ऑरेंज कॅप काबीज केली होती. सॅमसनने शिखर धवनकडून ऑरेंज कॅप हिसकावली होती. दरम्यान, आजच्या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर ताबा मिळवला आहे. अवघ्या २४ तासात आत त्याने ही कॅप सॅमसनकडून हिसकावली.

आजच्या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी आज कोलकाताकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे. मागच्या सामन्यात महागडा ठरलेल्या प्रसिध कृष्णाऐवजी संदीप वॉरियरला संघात स्थान देण्यात आले आहे. तर दिल्लीने दुखापतग्रस्त पृथ्वी शॉबदली स्टीव्ह स्मिथला संघात घेतले आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स – शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, टिम साउदी, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि लॉकी फर्ग्युसन.

दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, आवेश खान.