जागतिक महिला बुद्धिबळ स्पध्रेतील भारतीय खेळाडू कोनेरू हम्पीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. चुकीच्या चाली केल्याचा फटका हम्पीला बसला आणि युक्रेनच्या मारिया मुझीचुकने १.५-०.५ अशी बाजी मारून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला़  हम्पी व मारिया यांच्यातील पहिले दोन सेट १-१ असे बरोबरीत सुटले होते. त्यामुळे त्यांच्यातील विजेता ठरविण्यासाठी टायब्रेकरचे दोन डाव खेळविण्यात आले. पहिल्या डावात हम्पीने ५८ व्या चालीत बरोबरी स्वीकारली. दुसऱ्या डावात हम्पीला विजयासाठी अनुकूल स्थिती मिळाली होती. ३४ व्या चालीत तिच्याकडे एक हत्तीची आघाडी होती.  मात्र ३५ व्या चालीत केलेली चुकीची चाल तिच्या पराभवास कारणीभूत ठरली. त्यानंतर केवळ सहा चालींमध्ये तिने डाव गमाविला.  मारिया हिला सोमवारी उपांत्य फेरीत भारताच्या द्रोणावली हरिकाशी खेळावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koneru humpy shocked by mariya muzychuk