ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी सराव म्हणून आयोजित स्पर्धामध्ये अव्वल खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ करत विजयी आगेकूच केली. सिडनी टेनिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हा आणि बल्गेरियाच्या स्वेताना पिरोंकोव्हाने उपांत्य फेरीत आगेकूच केली. द्वितीय मानांकित क्विटोव्हाने चेक प्रजासत्ताकच्याच ल्यूसी साफ्रोव्हावर ७-६(४), ६-२ अशी मात केली. पिरोंकोव्हाने इटलीच्या सारा इराणीवर ७-६(२), ६-३ असा विजय मिळवला. क्विटोव्हा आणि पिरोंकोव्हा यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे. पुरुषांमध्ये अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने निकोलस माहुतवर १-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या मारिंको मॅटोसेव्हिकने तृतीय मानांकित आंद्रेस सिप्पीवर ६-३, ६-४ अशी मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2014 रोजी प्रकाशित
क्विटोव्हा, पिरोंकोव्हा उपांत्य फेरीत
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी सराव म्हणून आयोजित स्पर्धामध्ये अव्वल खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ करत विजयी आगेकूच केली.

First published on: 09-01-2014 at 03:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kvitova pironkova keys kerber into sydney semis