बार्सिलोना आणि रिआल माद्रिद हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. बार्सिलोनाकडे लिओनेल मेस्सी, नेयमार व लुईस सुआरेझसारखे प्रतिभावंत खेळाडू असले तरी त्यांना तोडीस तोड उत्तर देणारे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गॅरेथ बॅले हे आक्रमक खेळाडू माद्रिदकडे आहेत़  मात्र, ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेत सोमवारी झालेल्या लढतीत सुआरेझ भाव खाऊन गेला़  उत्तरार्धात त्याने नोंदविलेल्या निर्णायक गोलच्या बळावर बार्सिलोनाने २-१ अशा विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला़  
मेस्सी याने फ्री किकद्वारा दिलेल्या पासवर जेरेमी मथियू याने बार्सिलोनास आघाडी मिळवून दिली. मात्र रोनाल्डोने अप्रतिम गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धातील या बरोबरीनंतर उत्तरार्धात बार्सिलोना संघाच्या खेळाडूंनी जोरदार चाली केल्या. अखेर सुआरेझ याला सूर गवसला. त्याने दानी अल्वीस याच्या पासवर खणखणीत गोल करीत बार्सिलोनास विजय मिळवून दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरा गोल होईपर्यंत आम्ही तोडीस तोड खेळ केला़  पूर्वार्धात पिछाडीवरून मुसंडी मारत सामन्यावर मजबूत पकड घेत आम्ही पुनरागमन केले; परंतु सातत्य टिकवण्यात आम्हाला अपयश आल़े
– कार्लो अँसेलॉट्टी,
रिआल माद्रिदचे प्रशिक्षक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luis suarez shines with stellar goal for barcelona