ICC Player Of The Month : भारताकडून फक्त मयंक अग्रवालला नामांकन; पुरस्कारासाठी ‘मुंबईकर’ खेळाडूशी भिडावं लागणार!

मयंकला डिसेंबर महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.

Mayank agarwal nomintaed for ICC Player of the Month award
मयंक अग्रवाल

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालला डिसेंबर महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मयंकशिवाय न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. नियमित सलामीवीर रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत मयंकने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.

या कालावधीत खेळल्या गेलेल्या २ सामन्यांमध्ये त्याने ६९.०० च्या सरासरीने २७६ धावा केल्या ज्यात २ अर्धशतक आणि १ शतकाचा समावेश आहे. मुंबईतील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मयंक भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने २ डावात १५० आणि ६२ धावा केल्या. मयंकने केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान त्याने फलंदाजांसाठी कठीण खेळपट्टीवर ५० धावांची शानदार खेळी खेळली.

हेही वाचा – ASHES : ब्रॉड-अँडरसननं इंग्लंडला तारलं; अटीतटीची चौथी कसोटी झाली ‘ड्रॉ’; आदित्य ठाकरे म्हणाले, “म्हणूनच आपण…”

मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल याने मुंबई कसोटीत डावातील सर्व १० विकेट घेत इतिहासात आपले नाव नोंदवले होते. अशी कामगिरी करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर जगातील तिसरा गोलंदाज ठरला. गेल्या महिन्यात ३ सामन्यांत त्याने १४ बळी घेतले आणि ११७ धावा करत फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mayank agarwal nomintaed for icc player of the month award adn

Next Story
ASHES : ब्रॉड-अँडरसननं इंग्लंडला तारलं; अटीतटीची चौथी कसोटी झाली ‘ड्रॉ’; आदित्य ठाकरे म्हणाले, “म्हणूनच आपण…”
फोटो गॅलरी