विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यामुळे क्रोएशियन फुटबॉलरसिकांच्या दु:खाला पारावार नाही. मेक्सिकोकडून ३-१ अशा फरकाने हार पत्करल्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. अनुभवी कर्णधार राफेल माक्र्वेझ हा मेक्सिकोच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ‘अ’ गटातून ब्राझील आणि मेक्सिको हे दोन संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
क्रोएशियामधील हॉटेल्स, चौक, आदी महत्त्वाच्या ठिकाणी साऱ्यांनीच या सामन्यासाठी मोठी गर्दी केली होती. क्रोएशियाचा संघ साखळीतील अखेरचा सामना जिंकून आपले आव्हान टिकवेल, अशी त्यांना आशा होती. परंतु दुसऱ्या सत्रातील फक्त दहा मिनिटांत मेक्सिकोने नोंदवलेल्या तीन गोलमुळे क्रोएशियाच्या आशा मावळल्या.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2014 रोजी प्रकाशित
मेक्सिकोकडून क्रोएशियाच्या ‘स्वप्नांना निरोप’
विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यामुळे क्रोएशियन फुटबॉलरसिकांच्या दु:खाला पारावार नाही. मेक्सिकोकडून ३-१ अशा फरकाने हार पत्करल्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे.
First published on: 25-06-2014 at 02:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mexico wins 3 1 against croatia