यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेच्या जेतेपदासह शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या शानदार प्रदर्शनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाचे कौतुक केले आहे.
‘‘डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेतील दिमाखदार कामगिरीसाठी सानियाचे मन:पूर्वक अभिनंदन. देशाप्रति आणखी एक देदीप्यमान कामगिरी,’’ अशा शब्दांत मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सानियानेही तात्काळ पंतप्रधानांच्या शुभेच्छा स्वीकारीत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
‘‘तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार, तुमच्या शुभेच्छांनी सन्मानित झाले आहे,’’ अशा शब्दांत सानियाने आपल्या भावना मांडल्या आहेत. सानियाने तिची झिम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅकच्या साथीने खेळताना तैपेईच्या स्यु वेई सेइह आणि शुआई पेंग जोडीचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला होता. कारासह तिची ही शेवटची स्पर्धा होती. जेतेपद पटकावीत सानिया कारासह भागीदारीचा शेवट गोड केला.

डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सानिया मिर्झाचे ट्विटरवरून अभिनंदन केले. सानियाची कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे पंतप्रधानांनी या ट्विटरमध्ये म्हटले आहे.यानंतर सानियानेही ट्विटरवर मोदींचे आभार मानले. 

डब्ल्यूटीए स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅक यांनी शानदार खेळ करत विजतेपदाला गवसणी घातली होती. सानिया -कारा जोडीने चायनीज तैपेईच्या सु-वेई-हेइह आणि चीनच्या शुएई पेंग यांचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला होता.