Nathan Lyon left behind Harbhajan Singh and Bishan Singh Bedi : सध्या ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानसोबत घरच्या भूमीवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. या प्रतिष्ठेच्या मालिकेतील दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायनने चार विकेट्स घेण्यात यश मिळवले. यासह त्याने एक विशेष कामगिरी केली आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये पाच देशांविरुद्ध ५० किंवा त्याहून अधिक यश मिळवणारा तो पाचवा गोलंदाज ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एवढेच नाही तर त्याने खास विक्रमांच्या बाबतीत भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि बिशन सिंग बेदी यांनाही मागे टाकले आहे. या दोन्ही भारतीय गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये चार संघांविरुद्ध अनुक्रमे ५०-५० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचे नाव पहिल्या क्रमांकावर येते.

मुथय्या मुरलीधरनचे नऊ संघांविरुद्ध ५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेने सात संघांविरुद्ध ही कामगिरी केली आहे. या दोन महान खेळाडूंनंतर रविचंद्रन अश्विन आणि शेन वॉर्न अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या दोन्ही खेळाडूंनी सहा देशांविरुद्ध अनुक्रमे ५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – IND vs SA 1st Test : ‘मी गेली ५० वर्षे क्रिकेट…’, केएल राहुलच्या शतकावर सुनील गावसकरांची प्रतिक्रिया

पाकिस्तानविरुद्ध नॅथन लायनची कामगिरी –

३६ वर्षीय नॅथन लायनने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध ४३ च्या सरासरीने ५२ विकेट्स घेतल्या आहेत. लायनच्या नावावर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत दोनदा पाच आणि तीन वेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेराथच्या नावावर आहे. हेराथने पाकिस्तानविरुद्ध एकूण १०६ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nathan lyon left behind former indian spinners harbhajan singh and bishan singh bedi in terms of special records vbm