KL Rahul’s century as one of the top-10 centuries in India’s Test history : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या शानदार शतकाचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कौतुक केले. गावसकर म्हणाले ही खेळी भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १० सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे . मंगळवारी पहिल्या दिवशी भारतीय संघाने ९२ धावांत चार विकेट गमावल्यानंतर राहुलने १३७ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. त्याला दक्षिण आफ्रिकेचा नवोदित वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने बाद केल्याने पाहुण्या संघाचा पहिला डाव २४५ धावांवर आटोपला.

राहुलच्या खेळीबद्दल गावसकर म्हणाले की, ‘त्याची शतकी खेळी कठीण खेळपट्टीवर आणि परिस्थितीत आली, जेथे चेंडू अनियमितपणे उसळी घेत होता. त्यामुळे अशा खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी मजबूत आत्मविश्वास आवश्यक असण्याची गरज आहे. मी ५० वर्षांहून अधिक काळ क्रिकेट खेळत किंवा पाहत आहे. मी निःसंशयपणे म्हणू शकतो की, राहुलचे हे शतक भारताच्या कसोटी इतिहासातील टॉप-१० शतकांमध्ये सामील झाले आहे. कारण येथील खेळपट्टी आणि परिस्थिती वेगळी आहे.’

Ruturaj Gaikwad's second century in IPL
IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

माजी खेळाडू म्हणाला, ‘फलंदाज इतक्या सहजासहजी आत्मविश्वास मिळवत नाहीत. विशेषत: जेव्हा चेंडू कोणत्याही वेळी गतीमान असतो.’ गेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर राहुलने मारलेल्या षटकाराचे कौतुक करताना गावसकर म्हणाले, ‘त्याने ज्या शॉटने शतक पूर्ण केले, त्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. तो एक लेंथ चेंडू होता आणि त्याने एक असा शॉट खेळला, जो आपण सहसा टी-२० मध्ये पाहतो. राहुलचे शतक हे त्याचे या मैदानावरील दुसरे शतक ठरले. येथे एकापेक्षा जास्त कसोटी शतके करणारा तो आता एकमेव परदेशी फलंदाज आहे.’

हेही वाचा – IND vs SA : विराट कोहलीने स्टुअर्ट ब्रॉडची ‘कॉपी’ करताच, बुमराहने भारताला मिळवून दिली विकेट, Photo होतोय व्हायरल

त्याच्या खेळीदरम्यान १४ चौकार आणि चार षटकार मारत, तो दक्षिण आफ्रिकेत कसोटी शतक झळकावणारा ऋषभ पंत नंतर दुसरा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. राहुलने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये शतके झळकावण्याचा विक्रमही सुरू ठेवला. त्याच्या आठ कसोटी शतकांपैकी पाच शतके या देशांमध्ये आहेत. भारताला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५ विकेट गमावून २५६ धावा केल्या असून त्यांची आघाडी सध्या ११ धावांची आहे.