Netherlands vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १९ व्या सामन्यात आज नेदरलँड्स आणि श्रीलंकेचा संघ आमनेसामने आहेत. हा सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत २६२ धावांवर आटोपला. आता श्रीलंका संघाला विजय मिळवण्यासाठी २६३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वचषकातील सातव्या विकेट्ससाठी ही सर्वात मोठी भागीदारी -.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सचा डाव ४९.४ षटकांत सर्वबाद २६२ धावांवर गडगडला. एकवेळ नेदरलँड्स संघाने ९१ धावांत ६ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, यानंतर सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या १३५ धावांच्या भागीदारीने डच संघाला मजबूत स्थितीत आणले. विश्वचषकातील सातव्या विकेट्ससाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. सायब्रँडने ८२ चेंडूंत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या, तर व्हॅन बीकने ७५ चेंडूंत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५९ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका आणि कसून राजिताने प्रत्येकी चार गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

नेदरलँड: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन एकरमन, बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि यष्टीरक्षक), लोगान व्हॅन बीक, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षना कसून रजिथा, दिलशान मदुशंका.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ned vs sl match updates netherlands team has set a target of 263 runs against sri lanka in world cup 2023 vbm