Premium

NEP vs IND: डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना साई किशोरला अश्रू अनावर, दिनेश कार्तिकने केले सूचक वक्तव्य; म्हणाला, “तुम्ही अप्रतिम…”

NEP vs IND Highlights, Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने नेपाळवर २३ धावांनी दमदार विजय मिळवला. सामन्यादरम्यान युवा खेळाडू साई किशोरला अश्रू अनावर झाले. त्याच्या या व्हिडीओवर दिनेश कार्तिकने मोठे विधान केले आहे.

NEP vs IND: Sai Kishore in tears during national anthem in debut match Dinesh Karthik makes suggestive remarks Said You are doing amazing
सामन्यादरम्यान युवा खेळाडू साई किशोरला अश्रू अनावर झाले. सौजन्य- (ट्वीटर)

NEP vs IND Highlights, Asian Games 2023: आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारतीय संघाने नेपाळचा पहिल्या सामन्यात २३ धावांनी पराभव केला होता. टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीतील विजयासह उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यातून साई किशोरने भारताकडून पदार्पण केले. आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच देशासाठी खेळणारा साई किशोर राष्ट्रगीत सुरू असताना भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मात्र, साई किशोरने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत सामन्यात चांगली कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साई किशोर हे टी२० देशांतर्गत क्रिकेटमधलं खूप प्रसिद्ध नाव आहे. तो आयपीएलमध्ये गुजरात संघाकडून खेळतो आणि त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचवेळी, तो तामिळनाडू टी२० लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाल्यावर त्याचा सहकारी दिनेश कार्तिकने आनंद व्यक्त केला.

कार्तिकने ट्वीटरवर पोस्ट केली आहे. तो म्हणाला, “मी त्याच्यासाठी जास्त आनंदी होऊ शकत नाही. सकाळी उठून जेव्हा मी प्लेइंग-११ मध्ये त्याचे नाव पाहिले तेव्हा तो माझ्यासाठी एक भावनिक क्षण होता. तुम्हाला काही लोकांनी चांगले करावे असे वाटते, तो नेहमी माझ्या यादीत शीर्षस्थानी होता. त्याने ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत फलंदाजी केली त्यावरून त्याची फलंदाजी सुधारली आहे, असे वाटते. आयपीएल सामन्यातील कामगिरीवरून जे तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व काही सांगते. त्याचे फलंदाजीचे पराक्रम आश्चर्यकारक होते आणि तेथून तो पूर्णपणे अशा व्यक्तीमध्ये बदलला ज्यावर कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारात त्याच्यावर संघाला विश्वास ठेवता येईल.”

पुढे दिनेश कार्तिकने लिहिले आहे की, “मी त्याच्याबद्दल बोलणे सुरू ठेवू शकतो, परंतु सध्या तो एक भारतीय क्रिकेटपटू होताना पाहून मला खूप आनंद झाला आहे आणि हे यश कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुला माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा!”

साई किशोरने विक्रम केला

या सामन्यात आर. साई किशोरने भारताकडून पदार्पण केले. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने या सामन्यात तीन झेल घेत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. पदार्पणाच्या सामन्यात तीन झेल घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. साई किशोरला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण त्याने आपल्या चार षटकांत गोलंदाजीने खूप प्रभावित केले. साई किशोरने चार षटकात २५ धावा देत एक विकेट घेतली.

हेही वाचा: NEP vs IND: ‘यशस्वी’भव! जैस्वालच्या तुफानी शतकापुढे नेपाळने टेकले गुडघे, २३ धावांनी विजय मिळवत भारत थेट सेमीफायनलमध्ये

काय घडलं मॅचमध्ये?

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून २०२ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने सर्वाधिक १०० धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगने ३७, ऋतुराज आणि शिवम दुबेने २५-२५ धावा केल्या. नेपाळकडून दीपेंद्र सिंगने दोन विकेट्स घेतल्या. सोमपाल कामी आणि लामिछाने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ नऊ गडी गमावून केवळ १७९ धावा करू शकला. दीपेंद्र सिंगने सर्वाधिक ३२ धावा केल्या. संदीप जोरा आणि कुशल मल्लाने २९ धावांचे, कुशल भुरटेलने २८ आणि करणने १८ धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे नेपाळ संघ हा सामना २३ धावांनी हरला. भारताकडून रवी बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेता आल्या. अर्शदीपला दोन आणि आर. साई किशोरला एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nep vs ind video sai kishore started crying during the national anthem in the debut match dinesh karthik wrote you do amazing avw

First published on: 03-10-2023 at 15:23 IST
Next Story
NEP vs IND: ‘यशस्वी’भव! जैस्वालच्या तुफानी शतकापुढे नेपाळने टेकले गुडघे, २३ धावांनी विजय मिळवत भारत थेट सेमीफायनलमध्ये