माजी डेव्हिसपटू नितीन कीर्तने तसेच मुंबईच्या आर्यन गोवेस यांनी बी.यू.भंडारी चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अग्रमानांकित कीर्तने याने आदित्य गोखले याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. त्याने एकतर्फी लढतीत ६-२, ६-१ असा दणदणीत विजय मिळविताना फोरहँडचे ताकदवान फटके व अचूक सव्र्हिस असा बहारदार खेळ केला.
गोवेस याने मनिंदरसिंग याच्यावर ६-२, ६-३ अशी मात केली. गोवेस याने सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत एकतर्फी विजय मिळविला. त्याला दुहेरीत मात्र पराभव पत्करावा लागला. गोवेस व गोखले यांना जयेश पुंगलिया व ताहा कपाडिया यांनी ३-६, ७-६ (७-४), १०-८ असे हरविले. दुहेरीच्या अन्य सामन्यात साहिल गवारे व कुणाल वझिरानी यांनी रोहन सामंत व ओसामा शेख यांचे आव्हान ६-४, ६-३ असे संपुष्टात आणले.
एकेरीत राघव जयसिंघानी यानेही उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याने गुजरातच्या यशद गणात्रा याला ५-७, ६-३, ६-२ असे पराभूत केले. धरणीधर मिश्रा याने आव्हान राखताना अमन शहा याच्यावर ५-७, ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : कीर्तने, गोवेस उपांत्य फेरीत
माजी डेव्हिसपटू नितीन कीर्तने तसेच मुंबईच्या आर्यन गोवेस यांनी बी.यू.भंडारी चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली.

First published on: 08-05-2015 at 12:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin kirtane aryan goveas in semifinals of national tennis tournament