पुढचे काही महिने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. बुमराहच्या पाठीच्या दुखापतीला शस्त्रक्रियेची गरज लागणार नसल्याचं समोर आलं होतं. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान बुमराहला ही दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नव्हतं. आपल्या पाठीच्या दुखण्यावर उपचारासाठी बुमराह बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासोबत इंग्लंडलाही गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत बुमराहला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेची गरज नसल्याचा अहवाल दिल्यानंतर, आगामी काळात बुमराह संघात लवकरच पुनरागमन करु शकतो. २०२० साली भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही बुमराहच्या तब्येतीच्या घडामोडींवर समाधान व्यक्त केलं आहे. त्यामुळे आगामी काळात बुमराह भारतीय संघात कधी पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No surgery for jasprit bumrah great news for india in busy season psd