Nominations announced for 'ICC Player of the Month' award; This time three Indians raced avw 92 | Loksatta

भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने, जाणून घ्या

आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी तीन भारतीय क्रिकेटपटूंना नामांकन, पाकिस्तान, बांगलादेश ऑस्ट्रेलियातील १-१ खेळाडूंचा या यादीत समावेश

भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने, जाणून घ्या
प्रातिनिधीक छायाचित्र (लोकसत्ता)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर २०२२ साठी पुरूष आणि महिला गटातील प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी ३ खेळाडूंची निवड केली आहे. दोन्ही श्रेणीतील एकूण ६ खेळाडूंपैकी ३ भारतीय आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि भारतीय पुरुष क्रिकेटपटू अक्षर पटेल यांचा समावेश आहे. प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे.

आयसीसी पुरुषांच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला सप्टेंबर २०२२ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी निवडण्यात आले आहे. रिझवानने गेल्या महिन्यात १० सामने खेळले. यातील त्याने २०१४ मध्ये अर्धशतक झळकावले. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनचेही नाव आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना ९ बळी मिळवले होते. ग्रीन याने देखील याच मालिकेत दोन आक्रमक अर्धशतके झळकावली होती. तर रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तसेच आशिया चषकात सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती.

हरमनप्रीत कौरसाठी सप्टेंबर २०२२ हा केवळ एक फलंदाज म्हणून नव्हे तर भारतीय संघाची कर्णधार म्हणूनही संस्मरणीय महिना होता. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा ३-० असा पराभव केला. १९९९ नंतर भारताचा इंग्लंडमध्ये हा पहिलाच मालिका विजय होता. हरमनप्रीतने या मालिकेत १०३.२७ च्या स्ट्राईक रेटने २२१ धावा केल्या. ती या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पहिल्या दोन सामन्यात तिने फिनिशरची भूमिका बजावली होती.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधाराला उपकर्णधार स्मृती मंधाना हिची चांगली साथ मिळाली. स्मृती मंधानाने पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही मालिकेत सातत्यपूर्ण धावा केल्या. आयसीसी ची १००% क्रिकेट सुपरस्टार स्मृती मंधाना ही टी२० मालिकेत भारताच्या एकमेव विजयात सामनावीर ठरली. तिने ५३ चेंडूत नाबाद ७९ धावांची तुफानी खेळी केली. तिने या मालिकेत ५५.५० च्या सरासरीने आणि १३७.०३ च्या स्ट्राईक रेटने १११ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“बोलताही येत नव्हतं.. विराट कोहलीने सांगितला पॅरिसमधील सर्वात वाईट अनुभव; म्हणाला, “एक वाईट स्वप्न”..

संबंधित बातम्या

सुनेमुळे बीसीसीआय अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; रॉजर बिन्नी यांना बजावली नोटीस
६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ
आशिष नेहराची मोठी भविष्यवाणी; ‘हा’ युवा फलंदाज भारतीय संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो
Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
विश्लेषण: मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडेल अशी क्षमता फ्रान्सच्या किलियन एम्बापेमध्ये आहे का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘काश्मीर फाइल्स’ प्रकरणी इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक : राजदूत
गोवरचा फैलाव करोनापेक्षा पाचपट वेगाने!; लस उपलब्ध असल्यामुळे धोका मात्र कमी
अठरा हजार पदे, आतापर्यंत सव्वाबारा लाख अर्ज !; पोलीस भरतीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद
जतच्या पाणीपुरवठय़ात कर्नाटकचाच खोडा; संयुक्त पाणी योजनेचा महाराष्ट्राचा प्रस्ताव धुडकावल्याने पाणीटंचाई
आरोग्य वार्ता : पाण्याचे अतिरिक्त प्रमाण आरोग्यासाठी घातक