Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही सध्याची महिला भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार (Captain) आहे. ८ मार्च १९८९ रोजी तिचा जन्म पंजाबमध्ये झाला. वयाच्या २० व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २००९ मध्ये महिला विश्वचषकादरम्यानचा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला सामना ठरला. नोव्हेंबर २०१८ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये शतकीय कामगिरी करत तिने इतिहास रचला.

२०१९ मध्ये ती १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरला. याच काळात ती बिग बॅश लिगमध्येही खेळली. जुलै २०२२ मध्ये तिच्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. तिच्याकडे १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने, १२४ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईने हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी केले.Read More
Smriti Mandhana lead Team India Against Nepal match
INDW vs NEPW : श्रीलंकेत अचानक बदलला टीम इंडियाचा कर्णधार, जाणून घ्या काय आहे कारण?

Smriti Mandhana Captain : महिला आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात टीम इंडिया नव्या कर्णधारासह मैदानात उतरली आहे. हरमनप्रीत…

Women's ICC T20 Ranking
ICC T20 क्रमवारीत भारताच्या लेकींची कमाल, हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्माची मोठी झेप

ICC Rankings: ICC ने महिलांची टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. आशिया कप २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचा फायदा या…

Richa Ghosh and Harmanpreet Kaur Half century
INDW vs UAEW: टीम इंडियाने पहिल्यांदाच ओलांडली दोनशेची वेस; ऋचा घोषची वादळी खेळी, युएईचा उडवला धुव्वा

Women’s Asia Cup T20 2024 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यूएईचा ७८ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने हा…

Harmanpreet Kaur's Reaction To Journalist's Question
IND vs PAK : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नाने हरमनप्रीत कौर आश्चर्यचकित; म्हणाली, ‘हे माझं काम नाही…’, VIDEO व्हायरल

Harmanpreet Kaur Press Conference : महिला आशिया चषक स्पर्धेत शुक्रवारी (१९ जुलै) भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेतील टीम…

India Women's vs Pakistan Women's Highlights Score in Marathi
INDW vs PAKW Highlights Score : भारताची विजयी सलामी; पाकिस्तानवर ७ विकेट्सनी मात, शफाली-स्मृतीचे हुकले अर्धशतक

India vs Pakistan Highlights Women’s Asia Cup 2024 : भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आहे. टीम…

India Women Cricket Team Scored Highest Ever Team Total In Womens Test
INDW vs SAW: भारताच्या लेकींचा विश्वविक्रम, ९० वर्षांच्या महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ

INDW vs SAW: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघादरम्यान चेन्नईच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय…

ICC Womens t20 World Cup schedule Announced IND vs PAK match on 6 October
Women’s T20 World Cup 2024 चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना किती तारखेला होणार, जाणून घ्या

Women’s T20 World Cup 2024 Schedule: महिला टी20 विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बांगलादेशच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा…

IND vs BAN T20I 2024 Starts On 28th April Women Team India Take Revenge of Harmanpreet Kaur
IND vs BAN Women’s T20I ‘या’ दिवशी होणार सुरु; २०२३ मधील ‘त्या’ वादाचा बदला घेणार का हरमनप्रीतची सेना?

Women’s Team IND vs BAN T20I: कटू प्रसंगानंतर आता पहिल्यांदाच भारतीय संघ २३ एप्रिलला बांगलादेशात पोहोचणार आहे. यावेळचा दौरा भारतीय…

Harmanpreet Kaur Breaks Many Records in WPL
9 Photos
PHOTO : मुंबईच्या हरमनप्रीत कौरनं मारलं दिल्लीच मैदान, गुजरातच्या गोलंदाजांना चीतपट करत लावली विक्रमांची रांग

WPL 2024 Updates : ९ मार्च रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने २० षटकांत…

Match Referee Check Harmantpreet Kaur Bat After 95 Runs power hitting
VIDEO: हरमनप्रीत कौरची विस्फोटक खेळी पाहून पंचही झाले चकित, सामन्यानंतर तपासली बॅट

या विजयासह मुंबई इंडियन्स बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यांच्या खात्यात आता १० गुण असून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

Harmanpreet Kaur 94 Runs Innings Made Mumbai Indians Win
WPL 2024: हरमनप्रीतचा दणका, ४८ चेंडूत ९५ धावांची दिमाखदार खेळी, मुंबई इंडियन्सचा थरारक विजय

Mumbai Indians: महिला प्रिमीयर लीगमधील १६वा सामना मुंबई इंडियन्स विरूध्द गुजरात जायंट्स यांच्यामध्ये खेळवला गेला. या अटीतटीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या…

WPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians Live Streaming Updates
WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई-दिल्ली आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

WPL 2024 Updates : २३ फेब्रुवारीपासून भारतात महिला प्रीमियर लीग २०२४ सुरू होणार आहे. डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि…

संबंधित बातम्या