Pakistan Squad for Australia and Zimbabwe Series: पाकिस्तानी संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळायची आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चार संघांची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे पीसीबीने चारही संघात एकाही खेळाडूला कर्णधार नेमलेला नाही. काही काळापूर्वी बाबर आझमने मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. ऑस्ट्रेलिया दौरा ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान असेल, तर सामने २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत बुलावायो, झिम्बाब्वे येथे खेळवले जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले होते. आता तिन्ही खेळाडू वनडे संघात परतले आहेत. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असेल. एकदिवसीय संघातील अनकॅप्ड खेळाडूंमध्ये आमिर जमाल, अराफत मिन्हास, फैसल अक्रम, हसीबुल्ला, मुहम्मद इरफान खान आणि सॅम अयुब यांचा समावेश आहे. जहाँदाद खान आणि सलमान अली आगा पहिल्यांदाच टी-२० संघात सामील झाले आहेत. तर पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पत्रकार परिषदेत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील पाकिस्तानच्या नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

झिम्बाब्वेविरूद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ

वनडे संघ

आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसीबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद इरफान खान, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज दहनी आणि तय्यब ताहिर

टी-२० संघ

अहमद डॅनियल, अराफत मिन्हास, हारिस रौफ, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), जहांदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान .

हेही वाचा – Pakistan Central Contract: इंग्लंडविरूद्ध मालिका विजयाचा शिल्पकार पाकिस्तानच्या केंद्रिय करार यादीतून बाहेर, बाबर आझम ‘या’ श्रेणीत

ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ

वनडे संघ

आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी.

टी-२० संघ

अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसीबुल्लाह, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcb announced pakistan squad for australia and zimbabwe series without captain babar azam saheen shah afridi rested for pak vs zim series bdg