‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अवघ्या दहा दिवसांनंतर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पध्रेला सुरुवात होत असली तरी खेळाडूंना त्याची चिंता नाही़ आयपीएल वेळापत्रकाशी खेळाडूंनी स्वत:ला जुळवून घेतले आहे,’’ असे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सांगितले. दिल्लीचा हा फलंदाज यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार आह़े दीड महिन्यांच्या विश्वचषक स्पध्रेनंतर लगेचच आयपीएलला सुरुवात होत आहे आणि खेळाडूंना हे थकवणारे आहे का, या प्रश्नावर सेहवाग म्हणाला, ‘‘मी वेळापत्रक पाहिलेले नाही, परंतु ८ एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू होत असल्याचे ऐकले आह़े त्यामुळे खेळाडूंकडे एक किंवा दोन आठवडय़ांचा विश्रांतीसाठी वेळ आह़े आम्ही व्यावसायिक आहोत़ वर्षांतून ६५ दिवस आयपीएल खेळण्यास काहीच हरकत नाही़ ’’
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2015 रोजी प्रकाशित
‘‘आयपीएल वेळापत्रकाशी खेळाडूंनी जुळवून घेतले आहे ’’
‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अवघ्या दहा दिवसांनंतर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पध्रेला सुरुवात होत असली तरी खेळाडूंना त्याची चिंता नाही़

First published on: 04-03-2015 at 03:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Players are now used to ipl schedule says virender sehwag