आयपीएल २०२१ स्पर्धेतील ३६वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने ६ गडी गमवून १५४ ही धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात राजस्थानने खराब सुरुवात करत एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या हंगामातील पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम राजस्थानच्या नावावर झाला आहे. राजस्थानने पहिल्या ६ षटकात ३ गडी गमावत फक्त २१ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन आणि यशस्वी जयस्वाल झटपट बाद झाले. त्यामुळे राजस्थानच्या संघावर दडपण आले. हे दडपण दूर करण्याचा प्रयत्न करत असताना डेव्हिड मिलर बाद झाला.

हेही वाचा – ENG vs IND : रद्द झालेल्या कसोटीबाबत मोठं अपडेट; BCCI आणि ECBनं घेतला ‘असा’ निर्णय!

राजस्थानने आज आपल्या संघात दोन बदल केले आहेत. डेव्हि मिलर आणि तबरेझ शम्सीला संघात स्थान देण्यात आले असून लुईस आणि मॉरिसला आराम दिला आहे. तर दिल्लीने आपल्या संघात एक बदल केला आहे. ललित यादवला संघात स्थान दिले असून मार्कस स्टॉइनिसला विश्रांती दिली आहे.

आयपीएल २०२१मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा

२१/३ राजस्थान वि. दिल्ली, अबुधाबी

२१/१ मुंबई वि. पंजाब, चेन्नई

२४/४ चेन्नई वि. मुंबई, दुबई

२५/१ कोलकाता वि. राजस्थान, मुंबई

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals registers lowest powerplay score in ipl 2021 adn
First published on: 25-09-2021 at 18:41 IST