निक विल्सन आणि अ‍ॅशले जॅक्सन यांनी शेवटच्या क्षणांमध्ये केलेल्या गोलच्या जोरावर रांची ऱ्हिनोजनी हॉकी इंडिया लीग स्पर्धेत उत्तर प्रदेश विझार्ड्सचा ३-१ने पराभव केला. कर्णधार मॉरिट्झ फुईरस्तेने २७व्या मिनिटाला गोल करत ऱ्हिनोजचे खाते उघडले. यानंतर अनेक वेळा विझार्ड्सचा बचाव भेदण्यात त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना यश मिळाले नाही. ऱ्हिनोज संघाने सहा पेनल्टी कॉर्नरच्या संधीही वाया घालवल्या.
विझार्ड्सच्या ल्युक डोइनरने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत बरोबरी केली.
दोन्ही संघांना अचूकतने गोल करण्यात अपयश आले. मात्र शेवटच्या मिनिटांमध्ये ऱ्हिनोजच्या निक विल्सनने डाव्या बाजूने रिव्हर्स फटका मारत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर अ‍ॅशले जॅक्सनने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि ऱ्हिनोजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.