Rishabh Pant Flying Bat in IND vs SL 1st T20I: भारत वि श्रीलंका पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करत २१४ धावांचा डोंगर उभारला. गिल-यशस्वीच्या जोडीने संघाला एक जबरदस्त सुरूवात करून दिली. यानंतर सूर्यकुमार आणि ऋषभच्या (Rishabh Pant) ७६ धावांच्या भागीदाराने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. या खेळीदरम्यान ऋषभ पंतच्या बॅटमधून पुन्हा एकदा भन्नाट शॉट्स पाहायला मिळाले. ऋषभ पंतने एक शॉट असा लगावला की चेंडूसह बॅटही हवेत उडाली, ज्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IND vs SL: मैदानावर झाला मोठा अपघात, रवी बिश्नोईच्या चेहऱ्याला चेंडू लागून आलं रक्त अन् मग… पाहा VIDEO

भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने ३३ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार मारत ४९ धावा केल्या. त्याचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने आपल्या स्टायलिश फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल ही सलामी जोडी बाद झाल्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर उतरला. सुरुवातीला संथ फलंदाजी करत पंतने गिअर्स बदलत तुफान फटकेबाजी केली. पण धडाकेबाज फलंदाजी करत असताना त्याच्या हातातून बॅट निसटली आणि हवेत उडाली.

हेही वाचा – IND vs SL 1st T20I Highlights: अखेरच्या षटकात रियान परागचे सलग दोन विकेट अन् श्रीलंका ऑल आऊट, गंभीर-सूर्याची विजयी सलामी

Rishabh Pant ची फ्लाईंग बॅट

१९व्या षटकात ऋषभचा हा आगळावेगळा शॉट पाहायला मिळाला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मथिशा पाथिरानाने रियान परागला जबरदस्त यॉर्कर टाकत पायचीत केले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर रिंकू सिंगने एक धाव घेत ऋषभ पंतला स्ट्राइक दिली. पंतला शेवटच्या षटकांचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता. त्यामुळे तिसऱ्या चेंडूवर त्याने बॅटचे स्कूप शॉट मारला आणि शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चौकार गेला.

हेही वाचा – IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचे सामने लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या योग्य चॅनेल व मोबाईल अ‍ॅप

यानंतर पुढच्या चेंडूवर पंतने पुन्हा एकदा भन्नाट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पंतने पुन्हा एकदा बॅट फिरवली आणि तगडा फटका खेळला. चेंडू बॅटने मारलाच त्याने पण बॅटही हवेत उडाली. त्याच्या हातातून बॅट निसटली आणि हवेत उडाली. इथे चेंडू सीमारेषेकडे गेला तर दुसरीकडे बॅटही हवेत उडाली. सुदैवाने पंतची बॅट उडाली तिथे कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता. बॅट इतकी उंच उडाली होती की श्रीलंकेच्या खेळाडूला दुखापत होऊ शकते. याआधीही आयपीएलमध्ये ऋषभ पंतची बॅट अनेकदा हातातून निसटली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant bat flying in the air after hits four in ind vs sl 1st t20i watch video bdg