Rishabh Pant Viral Video: आयपीएल २०२५ ची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आयपीएलचा पहिला सामना २२ मार्चला गतविजेते केकेआर वि. आरसीबी यांच्यात होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बरेचसे खेळाडू आपआपल्या संघात सामील झाले आहेत. संघातील खेळाडूंचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओही येत आहेत. याचदरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंतचा स्टुपिड स्टुपिड स्टुपिड बोलतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. पण खरंतर पंतने हा व्हीडिओ रिक्रिएट केला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यात संघाला गरज असताना ऋषभ पंत बाद झाल्यावर भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर त्याच्यावर कॉमेंट्री करतानाच संतापले होते आणि तेव्हा ते पंतला स्टुपिड म्हणाले होते.

पंत हा कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मधील बॅटसह त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना पंत बाद झाला तेव्हा त्याच्यावर जोरदार टीका केली होती. आता भारताच्या यष्टिरक्षक फलंदाजाने गावस्करांची नक्कल केली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पंत आऊट झाल्यावर गावस्करांनी त्याला मूर्ख म्हटले. कॉमेंट्री करताना ते रागाने म्हणाले होते, “स्टुपिड स्टुपिड स्टुपिड.” आता पंत स्वतः आयपीएल २०२५ च्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये गावस्करांच्या ओळीची नक्कल करताना दिसला. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. असे पंतने या व्हिडिओत म्हटले आहे. पंतने या व्हीडिओमध्ये “स्टुपिड स्टुपिड स्टुपिड…” एवढंच म्हटलं आहे.

ऋषभ पंत यंदा वेगळ्या संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) सह नऊ वर्षे घालवल्यानंतर, पंतला मेगा लिलावात संजीव गोएंका यांच्या लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने विक्रमी २७ कोटी रुपयांना विकत घेतले. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी पंतला फ्रँचायझीचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. त्याने आयपीएल २०२४ मध्ये १५५ च्या स्ट्राईक रेटने ४४६ धावा केल्या. मात्र, त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant recreates sunil gavaskar stupid critical remarks from bgt commentary watch video ipl 2025 bdg