Rishabh Pant Statement on T20 World Cup 2024 Fake Injury: टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत वि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीचा सामना सुरू होता आणि हा सामना दक्षिण आफ्रिका जिंकणार अशी एक वेळ स्थिती निर्माण झाली होती. पण या सामन्यात तितक्यात ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि मैदानात तो पायाला पट्टी बांधून घेत असल्याचे दिसले, ज्यामुळे सामना थोडावेळ थांबवण्यात आला. पण ऋषभ पंतला खरंतर दुखापत झाली नव्हती, यामागचं नेमकं सत्य काय आहे, हे पंतने स्वत: सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माने अलीकडेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये खुलासा केला होता की, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने विश्वचषक फायनलमध्ये जाणूनबुजून ब्रेक घेतला होता. रोहित म्हणाला की, पंतच्या या चतुराईमुळे सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या बदलण्यास मदत झाली. आता या घटनेवर पंतचे वक्तव्य समोर आले आहे. अचानक हे असं काही करण्याचा विचार का आला हेही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा – Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

ऋषभ पंतने रोहित शर्माच्या टी-२० वर्ल्डकप फायनलमधील खोट्या दुखापतीच्या वक्तव्यावर केला मोठा खुलासा

टी-२० वर्ल्डकप फायनलमधील त्या दुखापतीबद्दल सांगताना पंत म्हणाला की, मी आधीपासूनच याबद्दल विचार करत होतो, कारण अचानक सामन्याचा रोख बदलला होता. म्हणून मी फिजिओला सांगत होतो की शक्य तितका वेळ काढ. आपल्याला सामन्याचा थोडा वेळ असाच घालावयाचा आहे. फिजिओने मला विचारलं, तुझं ढोपर ठीक आहे ना, मी म्हटलं मी ठीक आहे, मी फक्त नाटक करतोय…

हेही वाचा – Rohit Sharma: कॅप्टन असावा तर असा… रोहित शर्माने अपघातग्रस्त मुशीर खानसाठी केलं असं काही की चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

पंतने अंतिम सामन्यात जेव्हा ब्रेक घेतला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. त्याचबरोबर तेव्हा मैदानात हेनरिक क्लासेन विस्फोटक फलंदाजी करत होता. पंत पुढे म्हणाला, “म्हणजे, मी असं म्हणत नाहीय की प्रत्येक वेळी असं काही केल्याने उपयोग होतोच, पण कधी कधी याचा परिणाम आपल्या बाजूने लागतो आणि मग अशा सामन्यात जेव्हा ही ट्रीक कामी आली तर सोन्याहून पिवळं…

चालू सामन्यात पंतची ही रणनीती संघाच्या चांगलीच कामी आली. या ब्रेकमुळे दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनची लय तुटली आणि तो हार्दिक पंड्याच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर आफ्रिकन संघाने झटपट विकेट आणि परिणामी अखेरीस संघाला सात धावांनी पराभव पत्करावा लागला. रोहितने अलीकडेच नेटफ्लिक्सवरील कपिल शर्मा शोमध्ये पंतच्या या ब्रेकबद्दल वक्तव्य केले होते. कर्णधारही म्हणाली की, पंतने निर्णायक वेळी केलेली सबब सामन्यातील महत्त्वपूर्ण वळण ठरली. पंतने हे केल्यामुळे हेनरिक क्लासेनची एकाग्रता भंग पावली आणि हार्दिकने त्याला बाद करून भारताला सामन्यात परत आणले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant statement on t20 world cup final injury antics told physio i was acting rohit sharma claim watch video bdg