Rohit Sharma’s Fastest 550 Sixes in International Cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या कांगारू संघाने भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. आता भारतीय संघही जशास तसे उत्तर देताना दिसत आहे. या दरम्यान रोहित शर्माने शानदार फलंदाजी करताना ८१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ षटकार आणि ५ चौकार मारले. तसेच त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे. त्याने सर्वात वेगवान ५५० षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ५५३ षटकार मारण्यासाठी ५५१ डाव घेतले. मात्र रोहित शर्मा या महान विक्रमाकडे वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. रोहित शर्माने ५५० षटकार ठोकणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. ही कामगिरी करण्यासाठी त्याने केवळ ४७० डाव घेतले. आता तो ख्रिस गेलच्या विक्रमापासून फक्त ३ षटकार दूर आहे. रोहित शर्माने ४ षटकार मारताच ख्रिस गेलला या बाबतीत मागे टाकेल. ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढण्यासाठी तो फक्त एक-दोन डाव घेणार हे त्याच्या आक्रमक शैलीवरून स्पष्ट होते.

हिटमॅनने ठोकले स्फोटक अर्धशतक –

प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघाने भारतासमोर ३५३ धावांचा डोंगर उभा केला. पण हिटमॅनच्या वादळीपुढे हे लक्ष्य खूपच किरकोळ दिसत होते. रोहित शर्मा येताच त्याने षटकार मारण्यास सुरुवात केली. त्याने ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने स्फोटक शैलीत अर्धशतक झळकावले. हिटमॅनच्या जबरदस्त फॉर्मनंतर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर आहे. आता पाहुणे संघ पुनरागमन करण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहायचे आहे.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाला दिले सरप्राइज, आश्विन आणि विराटने मारली मिठी, पाहा VIDEO

यादरम्यान रोहित शर्माने ५ षटकारांच्या मदतीने अवघ्या ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यासह कर्णधार रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० षटकात ५० पेक्षा जास्त धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी ही कामगिरी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –

क्रिल जेल – ५५३
रोहित शर्मा- ५५१
शाहिद आफ्रिदी- ४७६

वनडेच्या पहिल्या १० षटकात ५०+ धावा करणारे भारतीय फलंदाज –

७ – वीरेंद्र सेहवाग
१- सचिन तेंडुलकर
१ – गौतम गंभीर
१ – रॉबिन उथप्पा
१ – रोहित शर्मा

या काळात रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५० षटकारांचा आकडाही गाठला. अशी कामगिरी करणारा तो गेलनंतरचा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर स्टार्क-कमिन्स-हेझलवूड या त्रिकुटाविरुद्ध वनडे सामन्यात ६ षटकार मारणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज आहे.

हेही वाचा – BCCI: विश्वचषकाच्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सराव सामन्यात चाहत्यांना का मिळणार नाही प्रवेश? जाणून घ्या कारण

या गोलंदाजांविरुद्ध रोहित शर्माने ठोकलेत सर्वाधिक षटकार –

१५- नॅथन लायन
१२ – पॅट कमिन्स
११ – डॅन पिएड
११ – मिचेल सँटनर
१० – ग्लेन मॅक्सवेल<br>१० – थिसारा परेरा
९ – मुस्तफिजुर रहमान

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma became the first batsman to hit 550 sixes in the shortest innings in international cricket in ind vs aus vbm