Rohit Sharma has a future in stand-up comedy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी फार काही चांगली ठरली नाही. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकदाही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. या दौऱ्यात रोहित शर्माने ५ कसोटी डावात फक्त ३१ धावा केल्या. यानंतर रोहित शर्माने सिडनी कसोटीत विश्रांतीचा निर्णय घेतला आणत्या सामन्यात रोहित खेळला नाही. रोहितच्या या निर्णयानंतर त्याच्या कसोटी कारकिर्दीची सांगता झाल्याची चर्चा रंगली. पण सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच रोहित शर्माने मुलाखत देत तो निवृत्त होत नसल्याचे सांगितले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने रोहित शर्मावर मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिचने रोहित शर्माला इशारा दिला की, कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी इंग्लंडमध्ये खेळणं हे सोपं ठिकाण नसेल. तो म्हणाला की, भारतीय कर्णधाराला आता कसोटी क्रिकेटमध्ये आपले भविष्य काय आहे हे चांगलेच कळलं असेल. कॅटिच म्हणाले की रोहितची गेल्या सहा महिन्यांतील कसोटीतील आकडेवारी चांगली नाही आणि कसोटी क्रिकेटमध्ये सलामी देणं आता ३७ वर्षीय खेळाडूसाठी आदर्श नाही.

हेही वाचा – Harbhajan Singh on Team India: राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर आल्यानंतर ‘टीम इंडिया’ची वाताहात; हरभजन सिंगचा थेट हल्ला

कॅटिच स्टार स्पोर्ट्शी बोलताना म्हणाले की, “रोहितची आकडेवारी पाहिली तर ती खूप निंदनीय आहे आणि ते या कसोटीतही पाहायला मिळाले. सिडनी कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेणं हा त्याचा खूपच निस्वार्थी निर्णय होता.”

पुढे कॅटिच म्हणाले, “मी रोहितची मुलाखत पाहिली, तो खूप चांगला बोलला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो भविष्यात स्टॅन्ड अप कॉमेडी करू शकतो, कारण त्याची विनोद बुद्धी खूपच चांगली आहे.”

हेही वाचा – IND vs AUS: सुनील गावस्करांचा अपमान केल्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं वक्तव्य, आपली चूक केली मान्य; नेमकं काय घडलं?

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकमध्ये रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्शी संवाद साधला. रोहित शर्माने सिडनी कसोटीत विश्रांती घेण्याचा त्याचा निर्णय हा संघासाठी त्याने घेतला होता आणि तो कसोटीतून निवृत्त होणार नसल्याचे त्याने स्पष्ट सांगितले. भारतीय संघ आता थेट जूनमध्ये कसोटी क्रिकेट खेळणार आहे. यासाठी टीम इंडिया इंग्लंडचा दौरा करणार आहे. रोहितचे वय पाहता इंग्लंडचा दौरा त्याच्यासाठी अवघड असणार आहे.

हेही वाचा – Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला नशेत चालताही येईना, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘तो’ Video व्हायरल, मद्यधुंद अवस्थेत…; नेमकं काय घडलेलं?

कटिज म्हणाले की, रोहित ३७ वर्षांचा आहे आणि त्याला या वयात पुन्हा तितक्याच धावा करण्याची भूक आहे की नाही हे फक्त त्यालाच माहीत आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका त्याच्यासाठी सोपी असणार नाही. इंग्लंडकडे गट ऍटकिन्सन आणि ब्रायन कार्ससह काही उत्कृष्ट युवा वेगवान गोलंदाज आहेत जे चमकदार कामगिरी करत आहेत. २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर यांना विचारण्यात आला होता. ते म्हणाले की जर रोहित इंग्लंडला गेला आणि भारतीय निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली तर हा दौरा त्याच्यासाठी कठीण असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma has a future in stand up comedy big statement by former australian simon katich ind vs aus bdg