Rohit Sharma gave a super over reaction : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी खेळला गेला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाने अफगाणिस्तान संघाचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा विजयाचा शिल्पकार ठरला. ज्यामुळे भारतीय संघाने ही मालिका ३-० ने जिंकली. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा सुपरओव्हर आपली प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्यानंतर सुपर ओव्हरबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मला आठवत नाही की शेवटच्या वेळी असे कधी घडले होते. माझ्या मते, मी आयपीएलच्या एका सामन्यात तीन वेळा फलंदाजी केली आहे. या सामन्यात भागीदारी करणे खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे रिंकू आणि मी सामन्यांमध्ये सातत्याने चर्चा करत होतो. आमच्यासाठी हा एक चांगला सामना होता. रिंकू, गेल्या काही मालिकांमध्ये त्याने दाखवून दिले की तो बॅटने काय करू शकतो.”

रोहित शर्मा रिंकू सिंगबद्दल म्हणाला, “रिंकू खूप शांत आहे आणि त्याला त्याची ताकद चांगली माहीत आहे. त्याच्याकडून जे अपेक्षित आहे ते करत आहे. त्याने भारतासाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. बॅकएंडवर असे कोणीतरी असणे हे संघासाठी चांगले आहे. त्याने आयपीएलमध्ये काय केले हे आपल्याला माहित आहे. तो भारतीय संघातही तशाच प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे.”

हेही वाचा – IND vs AFG : अफगाणिस्तानला हरवून रोहित शर्माने केला मोठा पराक्रम, धोनीच्या ‘या’ विक्रमाशी साधली बरोबरी

तत्पूर्वी, रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावा केल्या. हे हिटमॅनचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला खेळाडू आहे. त्याचबरोबर रिंकू सिंगने शानदार साथ देत दमदार भागीदारी केली. रिंकूने ३९ चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांसह ६९ धावांची नाबाद खेळी खेळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १९० धावांची भागीदारी केली.

हेही वाचा – आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारतासमोर उझबेकिस्तानचे आव्हान!

२२/४, २१२-२१२, १६-१६, १२-१

नाटयमय घडामोडींची रोलरकोस्टर राईड ठरलेल्या लढतीत भारत-अफगाणिस्तान तिसरा ट्वेन्टी-२० सामना आणि सुपर ओव्हर टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फिरकीपटू रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय घेतला आणि भारताने विजय साकारला. रोहित शर्माच्या शतकी खेळीला गुलबदीन नईब-मोहम्मद नबी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असा विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma said i have batted three times in one ipl match before ind vs afg 3rd t20 match vbm