IND vs NZ Champions Trophy Final 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील हा दुसरा अंतिम सामना आहे. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० चा अंतिम सामनाही भारत आणि न्यूझीलंडमध्ये झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने चार विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारतीय संघाचे स्टार खेळा़डू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या अंतिम फेरीत मैदानावर उतरताच मोठा रेकॉर्ड केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने खेळलेल्या ICC फायनल

३ T20 वर्ल्ड कप (२००७, २०१४, २०२४) फायनल, २ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (२०२१, २०२३), ३ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (२०१३, २०१७, २०२५) आणि एक वनडे वर्ल्ड कप फायनल (२०२३)

विराट कोहलीने खेळलेल्या ICC फायनल

२ T20 वर्ल्ड कप (२०१४, २०२४) फायनल, २ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (२०२१, २०२३), ३ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (२०१३,२०१७,२०२५) आणि दोन ODI वर्ल्ड कप फायनल (२०११, २०२३)

सर्वाधिक आयसीसी फायनल खेळलेले फलंदाज:

विराट कोहली- ९ फायनल
रोहित शर्मा- ९ फायनल
युवराज सिंग- ८ फायनल
रवींद्र जडेजा- ८ फायनल
महेला जयवर्धने- ७ अंतिम
कुमार संगकारा- ७ फायनल

विराट कोहलीचा ५५० वा आंतरराष्ट्रीय सामना

विराट कोहलीचा हा ५५०वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. ५५० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने एकूण ६६४ सामने खेळले आहेत.

भारत वि. न्यूझीलंड अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करत आहे. यासह संघाने १५ षटकांतच ८३ धावा करत ३ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आहेत. कुलदीप .यादवने २ तर वरूण चक्रवर्तीने १ विकेट घेतली आहे. विल यंग १५ धावा, रचिन रवींद्र ३७ धावा तर केन विलियमसन ११ धावा करत बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma virat kohli world record becomes the batter who played most icc tournament finals bdg