बॉक्सिंगच्या चाहत्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. आर्मेनियन बॉक्सर अरेस्ट सहक्यानचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी २६ डिसेंबर रोजी इगोर सेमारिनविरुद्धच्या लढतीत डोक्याला दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला होता. गंभीर दुखापतीमुळे सहक्यान कोमात गेला. या घटनेनंतर दहा दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लढतीच्या आठव्या फेरीत, विरोधी खेळाडू सेमारिनने सहक्यानविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. यानंतर २६ वर्षीय सहक्यानला रिंगमधून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रशियन मीडियाच्या मते, सहक्यानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. अनेक प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.

हेही वाचा – ASHES : तब्बल ६ वर्षानंतर स्मिथनं केलं असं काही की लाबुशेननं घेतलं उचलून; पाहा VIDEO

कझाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या रशियातील तोल्याट्टी येथे मंगळवारी सहक्यानच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचा मृतदेह अर्मेनियामध्ये पुरला जाईल, जिथे त्याचा जन्म झाला. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत सहक्यनने नऊ पैकी सहा सामने जिंकले आहेत. या सर्व लढती सुपर मिडलवेट विभागात झाल्या. त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या चार लढती जिंकल्या, त्या सर्व थायलंडमध्ये झाल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian boxer arrest sahakyan dies after ko left him in coma adn