घरच्या क्रिकेटरसिकांसमोर अखेरची कसोटी खेळणार असल्याचा आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची सचिन तेंडुलकरची भावना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने प्रकट करण्यात आली. याप्रमाणे एमसीएकडून होणारा कोणताही सत्कार माझ्यासाठी सन्मानाचा असेल, असे मतही त्याने प्रकट केले.
‘‘मुंबईत घरच्या क्रिकेटरसिकांसमोर खेळणार असल्याचा सचिन तेंडुलकरला अतिशय आनंद होत आहे. कसोटी कारकीर्दीतील अखेरचा सामना आईला पाहता यावा, याकरिता सचिनच्या इच्छेनुसार हा सामना वानखेडेवर होणार आहे. एमसीएने कोणत्याही प्रकारे आपला सत्कार केला, तरी तो माझ्यासाठी आनंददायी असेल सचिनने आम्हाला सांगितले आहे,’’ अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी दिली. सचिन १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत आपल्या कारकीर्दीतील दोनशेवी कसोटी खेळून निवृत्ती पत्करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरच्या रसिकांसमोर अखेरच्या कसोटीचा सचिनला अत्यानंद -एमसीए

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar happy to play in front of home crowd mca