भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिझाने डब्लूडीए दुहेरीच्या क्रमवारीमध्ये अव्वल दहा स्थानांमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी सानिया अकराव्या स्थानावर होती, पण गेल्या काही दिवसांतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर तिने क्रमवारीत नववे स्थान पटकावले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सानियाने चीन खुली स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर पॅन पॅसिफिक खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. सानियाची दुहेरीतील सहकारी कारा ब्लॅकने क्रमवारीत १३ वे स्थान पटकावले आहे. यंदाच्या वर्षांत सानियाने ब्रिस्बेन खुली स्पर्धा, दुबई टेनिस स्पर्धा, न्यू हावेन टेनिस चषक तसेच पॅन पॅसिफिक स्पर्धेच्या जेतेपदांवर नाव कोरले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-10-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza breaks back into top 10 in womens double rankings