भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्र्झलडची मार्टिना हिंगीस या जोडीने मियामी खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारली. टाइमा बाबोस आणि क्रिस्टीना मॅलाडेनोविक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव करून मिर्झा-हिंगीस जोडीने सलग दुसरे जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केले आहे.
 मिर्झा व हिंगीस जोडीने ६-२, ६-४ अशा फरकाने बाजी मारली. अंतिम फेरीत त्यांना एकाटेरिना माकारोवा आणि एलेना वेस्नीना या जोडीचा सामना करावा लागेल. माकारोवा व वेस्नीना यांनी अँड्रीआ हॅलावाकोवा आणि लुसी ऱ्हाडेका जोडीवर ६-४, ६-२ असा विजय मिळवला.