Sara Tendulkar Dating Rumours: भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची लेक नेहमीच चर्चेत असते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि तिच्या फोटो, व्हीडिओवर चाहते लाईक्स, कमेंटसचा चाहते पाऊस पाडतात. सारा तेंडुलकरचं नाव भारताचा क्रिकेटपटू गिलबरोबर जोडलं जात होतं. आता पुन्हा एकदा साराचे नाव याच कारणामुळे चर्चेत आहे. साराचं नाव आता बॉलीवूडमधील अभिनेत्याबरोबर जोडलं जातं. या अभिनेत्याला सारा डेट करत असल्याचा दावा एका बातमीमध्ये केला आहे.
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याची नेहमीच चर्चा होत असते. पण आयपीएलदरम्यान शुबमन गिलच्या मुलाखतीतील एका वक्तव्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. गिलला मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल विचारले असता त्याने सांगितलं की तो गेली ३ वर्ष सिंगल आहे आणि त्याच्या क्रिकेट करियरवर लक्ष देत आहे. गिलच्या मुलाखतीतील वक्तव्यापूर्वी गिल आणि साराने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. तर गिलच्या वक्तव्यामुळे या चर्चाही थांबल्या. आता सारा तेंडुलकरचं नाव बॉलीवूड अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

फिल्मफेअरमधील एका वृत्तानुसार, दिग्गज भारतीय फलंदाजाची लेक सारा तेंडुलकर अभिनेता सिध्दांत चतुर्वेदीला डेट करत आहे. सारा आणि सिद्धांत हे दोघेही अलिकडच्या काळात काही वेळा एकत्र दिसले आहेत. रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की अद्याप दोघांपैकी कोणीही याबाबत अधिकृतपणे काही बोललेलं नाही. परंतु त्यांच्यातील जवळीक वाढली आहे. रिपोर्टमध्ये सूत्रांचा हवाला देऊन असा दावाही करण्यात आला आहे की सारा आणि सिद्धांत सध्या त्यांचे नाते चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवत आहेत.

पण तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांव्यतिरिक्त, सारा इतर महत्त्वाच्या कारणांमुळेही चर्चेत राहते. काही महिन्यांपूर्वीच सारा तेंडुलकरला सचिन तेंडुलकर फाउंडेशनचे संचालकपद देण्यात आले. हे फाउंडेशन मागास भागातील गरीब मुलांना मदत करण्याचे काम करते. याशिवाय, अलिकडेच साराने ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबईचा संघ खरेदी केला आहे. साराने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याची माहिती दिली.

कोण आहे सिद्धांत चतुर्वेदी?

सिध्दांत चतुर्वेदी गली बॉय चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. ‘इनसाइड एज’ या वेब सिरीजमध्ये एका तरुण क्रिकेटपटूची भूमिका साकारून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ चित्रपटात एमसी शेरची भूमिका त्याने साकारली. या रॅपरच्या भूमिकेमुळे तो एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आला आणि सिद्धांतचे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara tendulkar dating siddhant chaturvedi bollywood actor relationship claim according to reports shubman gill bdg