scorecardresearch

शुबमन गिल

शुबमन गिल (Shubman Gill) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्याच्या वडिलांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. लहानपणी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रशिक्षणासाठी ते मोहाली येथे राहायला गेले. त्यानंतर शुबमनला पंजाबच्या संघाकडून (Punjab Team)खेळायची संधी मिळाली. राज्यस्तरीय अंडर-१६ स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१६-१७ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पुढच्या वर्षी त्याला रणजी स्पर्धेमध्ये खेळायची संधी मिळाली. या दोन्ही महत्त्वपूर्ण स्पर्धोंमध्ये शुबमनने चांगला खेळ करत अनेक विक्रम केले. पुढे त्याला देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया-सीकडून खेळला.

राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कौशल्य दाखवल्यानंतर २०१८ मध्ये शुबमन गिल अंडर-१९ विश्वचषकासाठीच्या भारतीय संघामध्ये सामील झाला. त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. झालेल्या एकूण सामन्यांमध्ये त्याने १२४.०० च्या सरासरीने ३७२ धावा केल्या. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने नाबाद १०२ धावा केल्या. शुबमन अंडर-१९ विश्वचषकामध्ये स्टार प्लेयर म्हणून झळकला. त्याच वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शुबमन गिल या तरुण खेळाडूवर कोलकाता नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक बोली लावली. २०१८-२०२१ या काळामध्ये तो केकेआरकडून खेळला. पुढे रिटेन न केल्याने २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्स या संघात सामील झाला. २०२३ च्या आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये त्याने तुफान फलंदाजी करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती.

२०१९ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या संघात शुबमन गिलचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे त्याने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे २०२० मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तर २०२३ मध्ये त्याला भारतीय संघातून टी-२० सामना खेळायची संधी मिळाली. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये शुबमन गिलने १८ कसोटी सामन्यांमध्ये ९६६, २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,४३७ आणि ४५ टी-२० सामन्यांमध्ये २९५ धावा केल्या आहेत. आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्तम खेळ दाखवल्याने भारतीय संघात त्याने जागा पक्की केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. येत्या आशिया कप २०२३ मध्येही त्याचा समावेश सलामीवीर फलंदाज म्हणून करण्यात आला आहे. आशिया कपसह विश्वचषकामध्ये शुबमन दिलेली जबाबदारी पार पाडेल अशी चाहत्यांना आशा आहे.

क्रिकेटव्यतिरिक्त शुबमन त्याच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याने ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटातील पवित्र प्रभाकर या पात्राच्या पंजाबी डबिंगसाठी आवाज दिला आहे. अनेक अभिनेत्रीशी त्याचे नाव जोडले जात आहे.
Read More
Shubman Gill and Shreyas Iyer partnership Records
IND vs AUS 2nd ODI: शुबमन-श्रेयसच्या भागीदारीने मोडला सचिन आणि लक्ष्मण जोडीचा २२ वर्ष जुना विक्रम

Shubman Gill and Shreyas Iyer partnership: शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने २०० धावांची भागीदारी करत इतिहास रचला. त्याचबरोबर सचिन आणि…

IND vs AUS 2nd ODI Match Updates
IND vs AUS 2nd ODI: शुबमन गिलने हाशिम आमलाचा विक्रम मोडत रचला इतिहास, झळकावले वनडेतील सहावे शतक

IND vs AUS 2nd ODI Match Updates: शुबमन गिलने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे पहिले…

IND vs AUS 2nd ODI Match Updates
IND vs AUS 2nd ODI: दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचे शानदार कमबॅक! टीका करणाऱ्यांना दिलं चोख प्रत्युत्तर, शुबमन गिलही शतकवीर

IND vs AUS 2nd ODI Match Updates: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. त्याचबरोबर दोघांनी…

IND vs AUS 2nd ODI Match Updates
IND vs AUS 2nd ODI: हिटमॅनला मागे टाकत शुबमन गिल बनला २०२३ चा सिक्सर किंग, जाणून घ्या किती मारलेत षटकार?

IND vs AUS 2nd ODI Match Updates: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिलने रोहित शर्माचा विक्रम मोडला. त्याचबरोबर या सामन्यात…

IND vs AUS 1st ODI Updates
IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम

IND vs AUS 1st ODI Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २७६ धावा केल्या होत्या.…

IND vs AUS 1st ODI: Team India becomes No.1 in ICC ranking after beat Australia by five wickets Shubman-Rituraj excellent batting
IND vs AUS 1st ODI: टीम इंडिया बनली नंबर १! भारताची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने मात, शुबमन-ऋतुराज चमकले

India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने…

Shreyas Iyer and Shubman Gill's confusion in the video
IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यर की शुबमन गिल, चूक कोणाची? रनआउटवर उपस्थित झाले प्रश्न, रैना-मिश्राने दिले ‘हे’ उत्तर

Shreyas Iyer’s run out video: पहिल्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्यात अशी चूक झाली की टीम इंडियाला…

IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS 1st ODI: मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का! मिचेल मार्शला धाडले तंबूत, पाहा VIDEO

IND vs AUS 1st ODI Match Updates भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला जात आहे.…

ICC Rankings: Siraj became the world's number one bowler took 10 wickets in the Asia Cup Virat's ranking also improved
ICC Ranking: नंबर १ मोहम्मद सिराज! आशिया कपमधील कामगिरीचे मिळाले बक्षीस, शुबमनचेही होणार…

ICC ODI Ranking: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे. आशिया चषक फायनलमधील…

List of Sportspersons Gifted Thar Car by Ananda Mahindra
9 Photos
PHOTOS: आनंद महिंद्रा यांनी नीरज-प्रज्ञानंदसह सहा क्रिकेटर्सना गिफ्ट केली आहे थार कार, पाहा कोणाच्या नावाचा समावेश

Ananda Mahindra Gifted Thar Car: मोहम्मद सिराजने आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजीने भारतीयांची मने जिंकली. यानंतर…

Rohit Sharma Angry at Shubman Gill
Asia Cup Final 2023: ‘मी हे करू शकत नाही, तू वेडा आहेस का?’; फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्मा शुबमन गिलवर संतापला, पाहा VIDEO

Rohit Sharma and Shubman Gill Video: रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय…

, Bangladesh win by 6 runs against India
IND vs SL: ‘…म्हणून बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला’; कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण

Asia Cup 2023 Updates: रोहित शर्माने शुबमन गिलचे कौतुक करत पराभवाचे कारण काय होते ते सांगितले. बांगलादेशने ११ वर्षांनंतर आशिया…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×