Sandeep Lamichhane: नेपाळमध्ये १४ फेब्रुवारीपासून नामिबिया, स्कॉटलंड आणि नेपाळ यांच्यामध्ये क्रिकेटची तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेमधील स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ या सामन्यामध्ये नेपाळचा माजी कर्णधार संदीप लामिचेन देखील सहभागी झाला होता. या सामन्यादरम्यान स्कॉटलंड संघाच्या खेळाडूंनी संदीप लामिचेनशी हात मिळवण्यास नकार दिला. हा सामना किर्तीपूर येथे खेळला गेला. क्रिकेटचा सामना खेळल्यानंतर प्रत्येक क्रिकेटपटू दुसऱ्या क्रिकेटपटू हात मिळवत हस्तांदोलन करत असतात. हे त्यांच्या खेळाडू वृत्तीचे प्रतीक मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑगस्ट २०२२ मध्ये संदीप लामिचेनवर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणामुळे त्याला शिक्षा देखील झाली होती. या काळात तो नेपाळच्या क्रिकेटच्या संघाचे नेतृत्त्व करत होता. बलात्काराच्या खटल्यावरुन त्याच्याकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली. संघामध्ये त्याला जागा द्यायला हवी की नको यावरुनही चर्चा सुरु होत्या. फेसबुक पोस्टद्वारे संदीपने त्याच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. जानेवारी २०२३ मध्ये तो जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आला. त्याच्यावरील बंदी हटवण्यात आली. मंगळवारी झालेल्या नेपाळ विरुद्ध नामिबिया या सामन्यामध्ये त्याला खेळवण्यात आले.

आणखी वाचा – चेतन शर्मा यांचा निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

त्यानंतर झालेल्या स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ सामन्यामध्येही संदीपचा सहभाग होता. या सामन्यामध्ये स्कॉटलंडचा पराभव झाला. सामना संपल्यावर हस्तांदोलन करत असताना स्कॉटलंडच्या खेळाडूंनी संदीपशी हात मिळवणे टाळले. एकूण प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित प्रकरणावर भाष्य करण्यास स्कॉटलंडच्या संघाने नकार दिला असला, तरी त्यांच्या या कृतीमागे बलात्काराच्या प्रकरणाची किनार असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – सलामीला गुजरात-चेन्नई आमनेसामने; ‘आयपीएल’च्या आगामी हंगामाला ३१ मार्चपासून प्रारंभ

२०१८ मध्ये संदीप लामिचेन प्रकाशझोतामध्ये आला होता. तो आयपीएल खेळणारा पहिला नेपाळी क्रिकेटपटू आहे. २०१८ च्या आयपीएल हंगामामध्ये दिल्लीच्या संघाने त्याच्यावर बोली लावली होती. त्याच्याकडे बिग बॉश लीगमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scotland players refuse to shake hands with sandeep lamichhane watch video yps