अमेरिकेची अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने जागतिक टेनिस क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. जर्मनीची अँजेलीक केर्बर व रुमानियाची सिमोना हॅलेप यांनी पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान पटकावले आहे. सेरेना हिला नुकत्याच झालेल्या दुबई स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते तरीही तिने अव्वल स्थान टिकविले आहे. तिने द्वितीय क्रमांकावर असलेल्या ली ना हिच्यापेक्षा सहा हजार गुणांची आघाडी घेतली आहे. दुबई स्पर्धा जिंकणाऱ्या व्हीनस विल्यम्सने २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोव्हा हिला तीन स्थान खाली यावे लागले आहे.
सविस्तर मानांकने
१.सेरेना विल्यम्स (अमेरिका)१२,६६० गुण. २.ली ना (चीन) ६,७९५ गुण. ३.अग्नीझेका राडवानस्का (पोलंड) ५,७०५ गुण, ४.व्हिक्टोरिया अझारेन्का (बल्गेरिया) ५,६८१ गुण, ५.मारिया शारापोवा (रशिया) ५,२०६ गुण. ६.अँजेलिक केर्बर (जर्मनी) ४,४९० गुण. ७.सिमोना हॅलेप (रुमानिया) ४,४३५ गुण. ८.येलेना यांकोविच (सर्बिया) ४,३८० गुण. ९.पेत्रा क्विटोवा (चेक प्रजासत्ताक) ४,३६५ गुण. १०.सारा इराणी (इटली) ४,१९५ गुण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena williams maintains top spot in wta rankings sister venus 29th