पालेमबांग, इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या २२व्या प्रेसिडेंट चषक खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या शमजेत्सबाम सरजूबाला आणि पिंकी जांगरा यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता पिंकीने ५१ किलो वजनी गटातून खेळताना मंगोलियाच्या नँन्डित्सेसेगवर २-१ असा विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या सरजूबालाने ४८ किलो वजनी गटातून खेळताना रशियाच्या इसेव्हा जोयावर मात केली.
प्रिया दयाल (५४ किलो), बिलाओ बसुमतराय (५७ किलो) तर प्रीती बेनिवाल (६० किलो) सहभागी झाल्या होत्या मात्र पदक फेरीपर्यंत त्यांना मजल मारता आली नाही. ३० विविध देशांचे १३० हून अधिक बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2015 रोजी प्रकाशित
सरजूबाला, पिंकीला सुवर्णपदक
पालेमबांग, इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या २२व्या प्रेसिडेंट चषक खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या शमजेत्सबाम सरजूबाला आणि पिंकी जांगरा यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.
First published on: 27-04-2015 at 04:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sh sarjubala pinky jangra bags gold boxing