Pakistan Cricket: Mickey Arthur likely to become online coach Shahid Afridi said It is beyond comprehension | Loksatta

Shahid Afridi: पाकिस्तान बोर्डाचा अजब कारभार! प्रशिक्षकाच्या निर्णयावर शाहीद आफ्रिदी संतापला म्हणाला, “आता काय ऑनलाईन क्रिकेट…”

Pakistan Cricket Team: माजी मुख्य निवड समिती प्रमुख शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. त्याने पीसीबीचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

Pakistan Cricket: Mickey Arthur likely to become online coach Shahid Afridi said It is beyond comprehension
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Pakistan Cricket Team: अलीकडच्या काळात पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्याला त्याच्याच घरात इंग्लंड आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ही खराब कामगिरी पाहता पाकिस्तान क्रिकेट लवकरच नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज मिकी आर्थरला ऑनलाइन मुख्य प्रशिक्षक बनवणार आहे. असे झाल्यास जागतिक क्रिकेटमध्ये प्रथमच असे घडेल. मात्र माजी मुख्य निवड समिती प्रमुख शाहिद आफ्रिदीने पीसीबीच्या या निर्णयावर टीका केली आहे.

आफ्रिदीला ऑनलाइन कोचिंगचा राग आला

या व्यवस्थेअंतर्गत, आर्थर पाकिस्तानी खेळाडूंना ऑनलाइन मोडमध्ये उपलब्ध असेल, तर उर्वरित सपोर्ट स्टाफ मैदानावरील खेळाडूंच्या प्रगतीवर लक्ष ठेवतील. मात्र, मिकी आर्थर यंदा भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पाकिस्तान संघासोबत उपस्थित राहणार आहे. त्यानंतर ऑनलाइन कोचिंग मिळणार नाही. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी या सर्व गोष्टींवर संतापला.

या ऑनलाईन कोचिंगबाबत पत्रकार परिषदेत शाहिद आफ्रिदीला प्रश्न विचारण्यात आला. यावर आफ्रिदी संतापला आणि म्हणाला की, “आपल्या देशात चांगल्या प्रशिक्षक लोकांची कमतरता आहे, परदेशी लोकांना प्रशिक्षक बनवले जात आहे. परदेशी ऑनलाइनबाबत शाहिद आफ्रिदी म्हणाला, “मीही ऑनलाइन कोचिंगबाबत कुठेतरी वाचले होते. ऑनलाइन कोचिंग कसे होणार हे समजत नाही. मला ही ऑनलाइन प्रणाली समजत नाही.”

हेही वाचा: Women T20 World Cup: “ज्युनियर विश्वचषक जिंकल्याने आम्हाला अतिरिक्त प्रेरणा…”, हरमनब्रिगेड टी२० विश्वचषकासाठी सज्ज

‘पाकिस्तानी प्रशिक्षक पीसीबीच्या पसंती-नापसंतीत अडकतात’

पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदी म्हणाला, “बघा, हे विदेशी प्रशिक्षकच का? तुमच्या देशात असे लोक आहेत. मला माहित आहे की पीसीबी देखील पाहतो की आमचे लोक राजकारणात अडकतात आणि आवडी-नापसंती करतात. मला समजते की जबाबदारी किती मोठी आहे हे समजणारे बरेच लोक आहेत.” तो पुढे म्हणाला, “मला वाटतं क्रिकेटमध्ये राजकारण बाजूला ठेवून चांगले आणि ठोस निर्णय घ्यावे लागतील. तरच तुमचा क्रिकेट संघ पुढे जाऊन कामगिरी करू शकेल. पण प्रशिक्षक बाहेरचाच असावा असे नाही. आमच्याकडे पाकिस्तानमध्ये संघाचे नेतृत्व करू शकणारे लोक आहेत. कोचिंग आहे आणि व्यवस्थापन आहे. हे अवघड काम अजिबात नाही.”

हेही वाचा: ICC T20 Rankings: भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज दीप्ती शर्माचा ICC T20 क्रमवारीत जलवा, अव्वल स्थानापासून फक्त एक पाऊल दूर

यापूर्वी ते पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकही होते

मिकी आर्थर यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. २०१६ ते २०१९ या काळात त्यांनी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. मिकी आर्थरने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांसोबत काम केले आहे. मिकी आर्थर प्रशिक्षक बनल्यास ते संघाला ऑनलाइन कोचिंग देतील, मात्र २०२३ च्या विश्वचषकादरम्यान ते संघासह भारताच्या दौऱ्यावर येतील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 19:43 IST
Next Story
Women T20 World Cup: “ज्युनियर विश्वचषक जिंकल्याने आम्हाला अतिरिक्त प्रेरणा…”, हरमनब्रिगेड टी२० विश्वचषकासाठी सज्ज