ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईमध्ये दिलीप कुमारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतातूनच नव्हे, तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही दिलीप कुमार यांच्या जाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये आफ्रिदी म्हणाला, ”खरे तर आपण अल्लाहचे आहोत आणि आपण त्याच्यासाठी परत येऊ. खैबर पख्तूनख्वा ते मुंबई आणि जगभरातील युसूफ खान साहेबांच्या चाहत्यांसाठी ही मोठी हानी आहे. ते आपल्या अंत: करणात राहतील. सायरा बानो साहिबांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो.”

 

भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा – VIDEO : क्रिकेटवेडा सुपरस्टार..! दिलीप कुमार यांनी राज कपूर यांच्याविरुद्ध खेळला होता सामना

दिलीप कुमार यांचा जन्म पेशावर येथे झाला. काही काळापूर्वी, खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारनेही तेथे त्यांचे वडिलोपार्जित घर खरेदी करण्यास मान्यता दिली होती. त्याचे घर संग्रहालयात रूपांतरित करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.