आपल्या जादुई फिरकीच्या बळावर भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा प्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्नला चक्क अ‍ॅनाकोंडा सापाचा सामना करावा लागला. ‘आय एम ए सेलिब्रेटी..
गेट मी आऊट ऑफ हीअर’ या रिअ‍ॅलिटी शोदरम्यान वॉर्नने एका आव्हानादरम्यान बेडूक, झुरळ आणि उंदरांचा सामना केला. त्यावेळीच विषारी नसलेल्या अ‍ॅनाकोंडा जातीच्या सापाने डोक्याचा चावा घेतला. दुखापत झाल्याने वॉर्नला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
‘‘वॉर्नला सापांची प्रचंड भीती वाटते. मात्र आव्हानासाठी त्याने धीराने सापाचाही सामना केला. वॉर्नच्या डोक्याला दंश करणारा साप विषारी नाही मात्र तो अतिशय आक्रमक असतो. त्याचे दात अत्यंत तीक्ष्ण असतात. एकाचवेळी शंभर अणुकुचीदार सुया टोचण्याएवढी ताकद अ‍ॅनाकोंडाच्या दातात असते,’’ असे टेन वाहिनीच्या प्रवक्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane warne bitten by snake on reality show