Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या मालिकेला पर्थ येथील पहिल्या सामन्याने सुरुवात आहे. सध्या नुकतीच मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्याने भारतीय संघ आणि कोच गौतम गंभीर दबाव आहे. दरम्यान या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रिकी पॉन्टिंगने मोठे वक्तव्य केले होते, ज्यावर गंभीरने सडेतोड उत्तर दिल्याने त्याच्यावर टीका होत आहे. अशात सौरव गांगुली त्याच्या समर्थनार्थ पुढे आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरव गांगुली गौतम गंभीरबद्दल काय म्हणाला?

एका मुलाखतीत सौरव गांगुलीने म्हटले आहे की, गौतम गंभीर जसा आहे तसाच राहील. एकदिवसीय आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर त्याचे इतक्या लवकर मूल्यमापन करणे योग्य नाही. गांगुली म्हणाला, “मला असे म्हणायचे आहे की गंभीरला त्याच्या परिस्थितीत सोडले पाहिजे. मी पाहिले की पत्रकार परिषदेत तो जे बोलला त्यावर खूप टीका झाली. तो असाच आहे आणि केकेआरने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, तेव्हा ही असाच होता. तेव्हा तुम्ही त्याचे कौतुक करत होता. आता त्याच्या कोचिंगखाली भारताने श्रीलंकेविरुद्धची वनडे आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली की लगेच टीका करायला सुरुवात केली. जे योग्य नाही.’

गौतम गंभीर पॉन्टिंगला काय म्हणाला होता?

i

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंगने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय असल्याचे मत व्यक्त केले होते. यावर पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला या संदर्भात प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, रिकी पॉन्टिंगने भारतीय क्रिकेटऐवजी ऑस्ट्रेलियन संघाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या वादावर आपले मत मांडताना सौरव गांगुली म्हणाला, गौतम गंभीर योग्यच आहे.

हेही वाचा – IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा

गंभीर जे काही बोलला त्यात काहीही चुकीचे नाही. –

u

y

सौरव गांगुली म्हणाला, “गंभीरने हे का करू नये? मी जेव्हापासून क्रिकेट पाहत आलो आहे, तेव्हापासून ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिकेटबद्दल आपापली मते देत आहेत, मग ते स्टीव्ह वॉ असो, रिकी पॉन्टिंग असो किंवा मॅथ्यू हेडन. गंभीर जे काही बोलला त्यात काहीही चुकीचे नाही. तो लढतो आणि स्पर्धा करतो, म्हणून आपण त्याला संधी दिली पाहिजे. त्याला कोच म्हणून २-३ महिने झाले आहेत. त्यामुळे आपण इतक्यात दोन मालिकेवरुन त्याचे आकलन करणे योग्य नाही आणि त्याला अजून वेळ द्यायला हवा.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly said on gautam gambhir statement on ponting in press conference there is nothing wrong in what he says vbm