प्रेक्षकांना मैदानावरील सूक्ष्म गोष्टीही पाहता याव्यात स्पायडरकॅमची निर्मित्ती करण्यात आली. मात्र हा कॅमेरा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथसाठी अडचणीचा ठरला.
चौथ्या कसोटीत विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी शानदार भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला झुंजवले. शतकी खेळीदरम्यान लोकेश राहुलचा उंच उडालेला झेल टिपण्याची स्मिथला संधी होती मात्र स्पायडर-कॅमच्या हालचालीमुळे स्मिथ गोंधळला आणि त्याच्या हातून झेल सुटला. चेंडू हवेत उडाल्यानंतर तो क्षण टिपण्यासाठी स्पायडरकॅमची आणि तो झेल टिपण्यासाठी स्मिथची लगबग उडाली. कॅमेऱ्याने तो क्षण कैद केला मात्र स्मिथला आपले काम पूर्ण करता आले नाही. झेल सुटल्या सुटल्या स्मिथने याविषयी तक्रारही केली. चेंडू कॅमेऱ्याला लागल्याने तो अवैध ठरायला हवा होता. मात्र या कॅमेऱ्याचे नियंत्रण करणाऱ्या ‘चॅनेल नाइन’ने चेंडू कॅमेऱ्याला किंवा त्याच्या वायरींना लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे.