भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतची आगामी रणजी करंडक स्पर्धेसाठी केरळ संघात निवड करण्यात आली आहे. ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज जवळपास नऊ वर्षांनंतर स्थानिक स्पर्धांमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००७ टी-२० विश्वचषक आणि २०११च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या श्रीशांतने त्याच्या सोशल मीडियावर गोलंदाजी करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले. यात एका व्हिडिओमध्ये श्रीशांतने डावखुऱ्या फलंदाजाला आऊटस्विंगरवर क्लीन बोल्ड केले.

हेही वाचा – IPL 2022 : मेगा ऑक्शनपूर्वी वसीम जाफरनं घेतला धक्कादायक निर्णय; सर्वजण झाले थक्क!

केरळ क्रिकेट असोसिएशनने २०२२च्या रणजी करंडक स्पर्धेसाठी २० जणांचा संघ जाहीर केला. सचिन बेबीला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले तर यष्टीरक्षक फलंदाज विष्णू विनोद उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. संजू सॅमसनचा एनसीएमध्ये असल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच संघात सामील होईल.

आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनसाठी श्रीशांत उपलब्ध असणार आहे. श्रीशांतने २०१३ मध्ये शेवटचा आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. त्याने आयपीएलमधील ४४ सामन्यांमध्ये ४०विकेट घेतल्या आहेत. आयपीएल २०२२चा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sreesanth clean bowls a batter with outswinger before ipl mega auction 2022 adn