भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा बहुतांश वेळा लोकांमध्ये काही बोलताना दिसत नाही. पण येथील एका कार्यक्रमात मात्र त्याने लोकांशी संवाद साधला आणि भारतीय कसोटी संघ संक्रमण अवस्थेत आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा, असे धोनीने सांगितले. ‘‘आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज नेहमीच असते. यापुढेही भारतीय संघाच्या पाठीशी राहा. भारतीय संघ चांगला आहे. त्यामध्ये काही बदल होत आहेत, आम्ही नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, पण यामध्ये तुमचा पाठिंबाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,’’ असे धोनी म्हणाला. धोनी पत्नी साक्षीसह झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार माहतो यांच्याबरोबर येथे एका मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेला होता. या मंदिराचे काम सुरू असून पुढील वर्षी हे मंदिर साऱ्यांसाठी खुले होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stand with the indian team says ms dhoni